prabodhini news logo
Home ठळक बातम्या अबॅकस शिक्षणामुळे मुलांचा सर्वांगिण विकास होण्यास हातभार लागतो – डॉ. ममता शिवतारे-लांडे

अबॅकस शिक्षणामुळे मुलांचा सर्वांगिण विकास होण्यास हातभार लागतो – डॉ. ममता शिवतारे-लांडे

0
235

पुणे शहरात पार पडली राष्ट्रीय अबॅकस स्पर्धा; देशभरातून 847 विद्यार्थ्यांचा सहभाग

झटपट गणित सोडविणारे विद्यार्थी ठरले चॅम्पियन

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – पुणे – झपाट्याने गणिती उदाहरणं सोडविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कौशल्याला वाव देणारी राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धा पुणे शहरात उत्साहात पार पडली. ग्लोबल व्हिजन फाउंडेशन पुणे संचलित इन्स्पायर अबॅकस अँड वेदिक मॅथ अकॅडमी यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत देशभरातून तब्बल ८४७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आपली बौद्धिक क्षमता सादर केली.
ही स्पर्धा पुण्यातील थेऊर चिंतामणी रोडवरील वृंदावन पॅलेस येथे पार पडली. यावेळी विद्यार्थ्यांनी अवघ्या पाच मिनिटांमध्ये मोठमोठी गणिती उदाहरणे अचूकपणे सोडवून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पुणे जिल्हा शिवसेना नेत्या डॉ. ममताताई शिवतारे-लांडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
यावेळी बोलताना डॉ. ममताताई शिवतारे-लांडे म्हणाल्या, “अबॅकस शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, स्मरणशक्ती, मानसिक गणित कौशल्य वाढते आणि सर्वांगीण विकासाला हातभार लागतो. शालेय अभ्यासात गणित विषय सोपा वाटण्यासाठी अबॅकस एक उपयुक्त माध्यम ठरत आहे.” त्यांनी इन्स्पायर अबॅकस ॲण्ड इन्स्पायर अबॅकस अँड वेदिक मॅथ अकॅडमी च्या कार्याची स्तुती केली.
या अबॅकसच्या राष्ट्रीय स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळविलेले श्रीयान तडस, मुआझ अन्सारी या विद्यार्थ्यांना अकॅडमीच्या वतीने प्रत्येकी 3 हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले.
राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशभरातून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी अनुष्का जाधव, अभिनव वाघमारे, साद अन्सारी, अनुश्री वारडोळे, सुकन्या चोरमारे, प्रांजल मेटकरी, संजीवनी परकाळे, निरंजन तांबे, सोहम रसाळ, इवान मोहंता, नुतन बडे, अन्वीशा शेंडकर, दिव्या पठारे, शर्वरी जाधव, संस्कार सरडे, बर्षा शर्मा, प्रज्वल मेटकरी, भक्ती भोसले, मोहिनी दांडे, सुरेश खताळ, रुद्र यादव, श्रावणी मापारी, दिपराज चव्हाण, ओंकार यादव या विद्यार्थ्यांना चॅम्पियन ट्रॉफीचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
अकॅडमीत उत्कृष्ट शिक्षक म्हणून कार्य करणाऱ्या वर्षा काळे, अनुष्का हंकारे, अनिता पाटील, कोमल पाटील, पल्लवी आहेर, प्रमिला बोराडे, विद्या ढगे, हर्षा चव्हाण, पुजा भगत व रुपाली बोडके या शिक्षिकांना बेस्ट टीचर अवॉर्ड देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी आष्टी पंचायत समिती माजी उपसभापती गोपाळभाऊ रकटाटे, श्रीगोंदा माजी कृषी अधिकारी बलभिम शेळके, प्राध्यापक जयसिंग कारखिले, ह.भ.प. अरविंद महाराज काळे, ह.भ.प. कैलास महाराज सातव, कराड उपविभागीय डाक अधिकारी अमित देशमुख, पुणे अनंतराव पवार अभियांत्रीकी महाविद्यालय प्रमुख अमर देशमुख, मुंबई क्राईम ब्रांच एपीआय मनिषा टुले-पिंगळे, पुणे विभागीय आयुक्त कार्यालय महसूल सहाय्यक मिलींद पोळ, सनदी लेखापाल अक्षय कदम, केंद्रप्रमुख थेऊर आशालता कटके, केंद्रसमन्वयक अमोल लाड, प्राध्यापिका ज्योती गायकवाड, माहिती तंत्रज्ञान अभियंता आशुतोष झा, ग्राम महसूल अधिकारी सदानंद चव्हाण, पुणे शहर शिवसेना प्रवक्ता अभिजीत बोराटे, महिला आघाडी प्रमुख शिवसेना सुवर्णा भाकरे, कॅप्टन दत्तात्रय शिंदे, दाक्षराज्ञी महिला मंच, पुणे च्या संस्थापिका सुजाता सातव, सरपंच विशाल हरगुडे, मनिषा दराडे, ऋषीकेश कामथे, नामदेव रकटाटे, योगेश खेडेकर, मंगेश कारखिले, प्रा. अनिकेत काळे, कुमार कापसे, अनिता कापसे आदींसह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अकॅडमीच्या अध्यक्षा अर्चना शेळके, सचिव दादासाहेब शेळके, संचालक रविंद्र रकटाटे, जय शेळके, सार्थक शेळके व सर्व ‍शिक्षकांनी परीश्रम घेतले. प्रास्ताविकात संस्थेचे सचिव दादासाहेब शेळके यांनी अकॅडमीची व स्पर्धेची माहिती दिली .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी जोशी यांनी केले. आभार संस्थेचे संचालक रविंद्र रकटाटे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here