
राग जरी आला तरीही
आई न बोलते काही.
घराच्या भिंतीही धरतात अबोला
त्यावरून कळते, चुकले काहीबाही.
वाटते मागावी क्षमा ,कान धरूनी
जवळ आईच्या जावे तर ती
म्हणते, होते असे कधीतरी
चूक समजून घेत आपली, सुधारावी.
किती शांत,समंजस आहे ती
तिच्या मौनाची भाषाही तशीच.
शब्द ओठांवर न कधी येती
मनात जाऊन गडप होती.
सावरणारी ती, जमते तिला माफ करणे
स्वतःच स्वतःला शांत ठेवून
काही भूजाल नाही आला, म्हणणं
जवळ घेऊन हळुवार मग समजावणं.
डाॅ. सौ. स्मिता सदानंद मुकणे.
ठाणे.















