
सांजवेळ झाली आता,
उरात हुरहूर दाटली
आठवांचे मोहोळ उठले,
कातर वेळ सरली
काळजाची सल माझ्या,
कशी सांगू शब्दातूनी
दाटलेल्या भावनांना,
वाहुदे डोळ्यांतुनी
जळणाऱ्या वातीचा श्वास
कोंडला या देहामध्ये
धगधगणाऱ्या ज्वाला
उसळती मनामध्ये
वळून पाहता आयुष्याकडे ,
भूतकाळ उभा ठाकला
संघर्षाचे अनेक क्षण ,
झेलताना कणा वाकला
कष्टांची परिसीमा झाली,
मृदुकरांची सालवटे निघाली
त्याच हातानी कित्येकांना,
सुखाची स्नेहसावली दिली
घेऊनी पंखात नवी भरारी,
जगण्यातील सुख शोधते
राहून गेलेले जगायचे क्षण ,
आता मनसोक्त जगून घेते
सौ.वंदना शशिकांत पाटील















