
वणी प्रतिनिधी – अमोल भालेराव, संदीप अवधूत
वणी पोलिस स्टेशन हद्दीतील मुळाने या गावातून विक्री करण्याच्या उद्देशाने आरोपी कांतीलाल पांडू पालवी याच्या कडून साडेतीन किलो गांजा सदृश्य वस्तू व एक मोबाईल असे ८१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे, हेमंत राऊत यांनी हस्तगत केला असून.गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गायत्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्य्क पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे,वणी करत आहेत.या करवाई मुळे असे निदर्शनास येत आहे की वणी परिसरात अवैद्य व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढले असून धार्मिक शहर अशी ओळख मागे टाकत वणी ही अवैध्य व्यवसायांची नगरी निर्माण झाल्याचे दिसत आहे.त्यात अवैद्य गुटखा विक्री गावठी दारू,सट्टा-मटका,जुगार,सोरट,अवैद्यवाहतूक,,गांजा,ई सर्व अंमली पदार्थ विक्री व अवैध व्यवसाय राजसोसपने सुरू असून.वणी सापुतारा या मार्गाने अवैद्य गुटखा वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असून वणी पोलिसांचे याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.वणी पोलिसांनी केलेल्या कारवाईतून वणीच्या डोंगराळ भागात मोठया प्रमाणात गांजाची लागवड झाल्याचा संशय निर्माण होत आहे.मागील वर्षी भातोडे येथील 200 किलो गांजा जप्तीची कारवाई व आत्ताची साडेतीन किलो गांजा जप्ती कारवाई यातून हेच निष्पन्न होत आहे.वणी परिसरात अवैध्य व्यवसायांनी उच्चांक गाठला असून पोलीस प्रशासन हे सर्व रोखण्यात सपशेल अपयशी ठरलेले दिसून येत आहे.यात वणी पोलीस ठाण्यात नव्याने पदभार स्वीकारलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षक गायत्री जाधव यांच्यापुढे हे आव्हान असून ते या सर्व अवैद्य व्यवसायांचा बंदोबस्त करतील का परिवर्तन घडेल का याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.















