
दिंडोरी प्रतिनिधी- अमोल भालेराव सह संदीप अवधूत – महसूल सप्ताहानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन दाखले वाटप केल्याने विद्यार्थी व पालकांचा वेळ व खर्च वाचणार असल्याने शासन आपल्या दारी हा उपक्रम यशस्वीपणे राबविला जात असल्याचे प्रतिपादन दिंडोरी पेठ उपविभागीय अधिकारी डॉ आप्पासाहेब शिंदे यांनी केले.
महसूल सप्ताह अंतर्गत दिंडोरी महसूल विभागाच्या वतीने दिंडोरी जनता इंग्लिश स्कुलमध्ये विद्यार्थ्यांना दाखले वाटप कार्यक्रमाप्रसंगी डॉ आप्पासाहेब शिंदे बोलत होते.
ते पुढे म्हणाले महसूल विभागाचा नागरिकांच्या दैनंदिन जीवनात अतिशय महत्त्वाचा सहभाग असतो. विविध कागदपत्रांची गरज आपल्याला शिक्षण,नोकरी,शासकीय योजना अशा अनेक ठिकाणी भासते. या सर्व सेवा अधिक प्रभावी, पारदर्शक आणि वेळेत देणे,हेच महसूल विभागाचे प्रथम कर्तव्य आहे. असे अध्यक्ष त्यांनी सांगितले.
व्यासपीठावर तहसीलदार मुकेश कांबळे,मविप्र संचालक प्रवीण नाना जाधव,परिक्षाविधींन उपजिल्हा धिकारी दीपा जेधे, पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत गवळी, मंडळ अधिकारी भारती रकीबे, माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे,शिवाजी जाधव गणपतर जाधव,बंडू भेरे,तुषार वाघ प्रा.शरद शेजवळ,उत्तम भरसठ पी.के.पगारे,डी.के.टोपले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मविप्र संचालक प्रवीण नाना जाधव यांनी मनोगत व्यक्त करताना छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धेच नव्हते,तर एक दूरदृष्टी असलेले प्रशासक देखील होते. त्यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची मजबूत पायाभरणी ही महसूल व्यवस्थेवर होती.आज त्यांच्याच प्रेरणेतून सुरू झालेल्या या अभियानामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत हे दाखले मिळत आहे,हे पाहून समाधान वाटते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना दाखले वाटप करण्यात आले.
प्रास्तविक प्राचार्य शरद शेजवळ यांनी केले.१ ऑगस्ट रोजी महसूल दिनाच्या निमित्ताने उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांचा नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात उत्कृष्ट कामकाज केल्याबद्दल उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी म्हणून गौरविण्यात आले होते.त्याबद्दल त्यांचा मविप्र संचालक प्रवीण नाना जाधव यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनाही ग्रंथ,शाल व पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
सूत्रसंचालन संतोष कथार यांनी तर आभार श्रीमती सुमन विरकर यांनी मानले. याप्रसंगी ग्रामस्थ शिक्षकवृंद विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.















