
ग्लोबल स्टार: मा. प्रशांत रामटेके सर
ग्लोबल फाउंडेशन च्या वतीने महाराष्ट्राच्या सुपुत्र तसेच प्रबोधिनी म्हणजे मुख्य संपादक असलेले मा. प्रशांत रामटेके सर यांना सर्वात श्रेष्ठ समजला जाणारा ग्लोबल स्टार 2025 राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला त्याबद्दल मा. प्रशांत रामटेके सर यांचे मनःपूर्वक अभिनंदन,
अगदी कमी कालावधीत त्यांनी हे यशाचे शिखर गाठले आहे, तसेच ते एक उतम पत्रकार आहेत, आणि साहित्याची आवड असल्यामुळे ते सर्व सारस्वतांच्या कविता अगदी शुल्क रकमेत प्रकाशित करीत असतात, त्यांचा स्वभाव गुणी आहे त्यामुळे ते सर्वांच्या हृदयातले ताईत बनवले आहेत ,तसेच सामाजिक राजकीय क्षेत्रात अगदी हिरहिरने सहभाग नोंदवून त्यांनी स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवला आहे .प्रत्येक कामात प्रशांत सर नेहमीच पुढे राहतात.
त्यांना गरिबीची जाणीव असल्यामुळे ते प्रत्येक व्यक्तीला आपला माणूस म्हणून मदत करत असतात, ज्या व्यक्तीला माणुसकीची ,कष्टाची जाणीव असते तीच व्यक्ती जीवनात यशाचे शिखर गाठत असते, त्याचेच फळ म्हणून त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील आठ पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. आणि त्यांच्या यशाची कमान अशीच नेहमी उंचावत राहावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना
राहो तुमची यशाची
अशीच उंच उंच कमान
नेहमीच मिळत राहो तुम्हाला
जीवनात मान आणि सन्मान.
मा.प्रशांत सर आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र
प्रमुख संचालिका
प्रा. समिंदर निवृत्तीराव शिंदे, लातूर














