
आदरणीय श्री. प्रशांत रामटेके सर आपणांस ग्लोबल फॉउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय ग्लोबल स्टार 2025 हा पुरस्कार जाहीर झाला आहे.खरंच सरजी पुरस्कार जाहीर होणं म्हणजेच हेच तर आपलं आहोभाग्यच म्हणता येऊ शकते.जे आपण समाजात,राजकीय क्षेत्रात आणि कार्यरत असलेल्या संस्थेत यांसाठी दिलेला बहुमूल्य वेळ आणि त्या त्या संदर्भात आपण केलेले गुणात्मक आणि लोकोपयोगी कार्याची दखल घेऊनच बहुमानास पात्र ठरलात.आपणांस हा मोलाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला.आणि होय, सरजी मला विशेष मनस्वीआनंद होत आहे,की आपल्या नेतृत्वाची,कर्तृत्वाची आणि दातृत्वाची यशस्वीपणे स्थित कार्यात कर्तव्याची धुरा सांभाळली.
तसेच अजून आपल्या हातून अलौकिक असे कार्य घडून येणारच.यात अजिबात शंका नाही.कारण आपल्या अंतरी दातृत्वाचा भावही मज भावला.श्रीयुत प्रशांतसर जरी एक ग्रामीण भागातून असले तरी आपण शून्यातून केलेली विश्व निर्मिती ही मनाला जाणवली आहे.तसेच आपण प्रामाणिक हाडाचे पत्रकार असून सामान्य गोरगरीब, दीनदलित जनतेला आपल्या हरहुन्नरी आणि निखळ व्यक्तिमत्वाचे पत्रकारितेतून समर्थपणे न्याय मिळवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न सातत्याने करीत असतात. तसेच समाजातीत,राजकारणातील आणि इतर अन्यत्र छोट्या मोठ्या स्तरातील बातम्या,कोणाच्या समस्या, अडीअडचणी,कोणाची गैरव्यवहारातून झालेली घोर फसवणूक,कोणाची झालेली यशस्वीतेकडे झालेली वाटचाल आणि त्यातूनच मिळालेला विजय या साऱ्यांनाच प्रसिद्धी देण्याचं महत्वपूर्ण काम समाजासाठी वा समाजाच्या हितासाठी आपण काहीतरी देणं लागतं. हाच मनी भाव अंतरी परिपूर्ण न्याय मिळवून देण्यासाठी स्वयं अनुभवातून करण्याचा यशस्वी प्रयत्न करतात.
अहो,पत्रकारिता लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असल्याने पत्रकारीतेत त्यात आपलं ध्येय ,कर्तव्ये आणि अधिकार समजून स्वतःला झोकून देऊन अहोरात्र ध्यास निश्चितीसाठी अपार कष्ट आणि अतोनात मेहनत करून समाजातील विविध घटकातील प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्याचं आत्यंतिक महत्वपूर्ण काम अगदी मनापासून निर्धास्तपणे करतात.त्याचबरोबर साहित्यक्षेत्रातही आपली वाटचाल उल्लेखनीय आहे.तसेच कोणतीही समस्या असो वा अडचणी असतील तर आपण भक्कमपणे त्या संदर्भात जाणून घेऊन त्यात परिपक्व विचारातून सोडवण्यासाठी प्रयत्न करीत असतात.
मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये.यासाठी नवोदित लेखकांच्या लेखणीला वाव आणि प्रसिद्धी मिळावी तसेच नवोदितांचे सर्व स्तरातून कौतुक व्हावे.यासाठी सर आपण आपल्या पोर्टल मार्फत साहित्यिकांच साहित्यांना प्रसिद्धी देतात.आणि होय,त्यांना स्वतःची वेगळी ओळख तयार करून देतात.अशा या होतकरू,प्रामाणिक आणि एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्यासारख्या तरुण, तडफदार पत्रकाराला स्वयं केलेल्या उल्लेखनीय कामाचा आढावा घेऊन आणि कर्तव्यदक्ष पत्रकार म्हणूनच योग्य ती दखल घेऊन ग्लोबल फॉउंडेशन या संस्थेतर्फे सन्मानित करण्यात येणार आहे.त्याबद्दल माझा मनस्वी मनोभावे सलाम ! तसेच आपण केलेल्या प्रशंसनीय कामगिरी कार्य कर्तृत्वास मानाने मनापासून अभिनंदन आणि मनस्वी शुभेच्छा !
सरजी,आपणांस अभिष्टचिंतन सोहळा अथवा वाढदिवसानिमित्ताने पुढील भावी भविष्यात अशीच यशस्वीपणे वाटचाल व्हावी .तसेच उत्तरोत्तर प्रगती होवो आणि आपणांस दीर्घायुष्य लाभो.हीच ईश्वर चरणी प्रार्थना आणि अपेक्षा व्यक्त करतो.
शब्दांकन पुष्पमाला
श्री शिवाजी किसन माळी, मुंबई















