
प्रशांतजी रामटेके,
राजबिंड व्यक्तिमत्व.
हर्ष देणारी घेणारी,
त्यांचे नेतृत्व दातृत्व.१
अडीअडचणी मध्ये,
देती मदतीचा हात.
गरिबांना गरजूंना,
न्याय सर्वांच्या कामात.२
लोकशाही पत्रकार,
ध्येय त्यांचे हेच खरे.
लेख बातम्या लोकांना,
न्यायप्रिय असे ठरे.३
खऱ्या बातम्या माध्यम,
प्रबोधिनी मंच नामे.
त्यात तेच सर्वेसर्वा,
सर्वोत्कृष्ट त्यांची कामे.४
जागतिक पुरस्कार,
प्राप्त पत्रकारितेत.
असे थोर नामवंत,
गुणवंत ते सत्येत.५
आज वाढदिवसाच्या,
त्यांना अनंत शुभेच्छा.
व्हावे शतायुषी त्यांनी,
हीच ईश्वरा सदिच्छा..६
स्वरचित..
सौ रेखा मालपुरे
कल्याण जि.ठाणे















