
तृप्ती चिद्रावार कार्यकारी संपादिका प्रबोधिनी न्युज – नृत्य क्षेत्रातील मान्यवर, भरतनाट्यम विषयात पदवीधर व गेली २५ वर्षे नृत्यकलेत अविरत योगदान देणारे सागर विजय अंदनकर यांचा आज वाढदिवस आहे. चंद्रपूरचे सांस्कृतिक दूत म्हणून प्रसिद्ध असलेले सागरभाऊ यांनी गरबा, लँसन्सो, नृत्यस्पर्धा तसेच शालेय व महाविद्यालयीन कार्यक्रमांमध्ये कोरिओग्राफर, नृत्य शिक्षक आणि परीक्षक म्हणून अमूल्य योगदान दिले आहे.
त्यांच्या बहुमूल्य कार्याची दखल घेत त्यांना *बेस्ट डान्सर अवॉर्ड*, *बेस्ट कोरिओग्राफर अवॉर्ड*, *बेस्ट डांडिया किंग अवॉर्ड* यांसह पोलिस मित्र पत्रसंवर्धन सेना, मंडट टीव्ही शो, इंटरडान्स कॉम्पिटिशन, चंद्रपूर लॉ कॉलेज, बिसरा मुंडा आदिवासी कार्यक्रम आदी मान्यवरांकडून अनेक सन्मान मिळाले आहेत.
साधा, मनमिळाऊ आणि कलावंत स्वभावाचे सागरभाऊ हे तरुणांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी सर्व चाहत्यांकडून आणि शुभेच्छुकांकडून हार्दिक शुभेच्छा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सागरभाऊ!















