
लाखांदूर येथील गीताचार्य तुकाराम दादा महाविद्यालय येथे 15 ऑगस्ट ला स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रम साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य अ वा गजभिये तर प्रमुख पाहुणे प्रा. रवींद्र मैंद तर ध्वजारोहक विमल खोब्रागडे आसगाव , संस्था सदस्य आदर्श शिक्षण संस्था ब्राम्ही ह्या होत्या .प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गीताचार्य तुकाराम दादा महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून मालार्पणं अर्पण करण्यात आले नंतर पाहुण्या च्या उपस्थितीत मान. ध्वजारोहक श्रीमती विमलताई खोब्रागडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे संचालन प्रा. नरेश गजभिये यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. प्रशांत वैरागडे यांनी केले.नंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमातील सांगता करण्यात आली कार्यक्रम यशस्वितेसाठी भूषण तावेडे , योगेश गोस्वामी यांनी सहकार्य केले.















