
भारतीय संविधान, सावित्री फुले स्मृती चिन्ह व साडी देऊन गौरव
साकोली तालुका प्रतिनिधी – साकोली १६ ऑगस्ट २०२५ रोजी ७९ वें भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून, अंगणवाडी मदतनीस पदभरती घोटाळ्याविरुद्ध आवाज उठवून त्यावर विजय मिळवणारी, शंकरपुर/वडेगांव येथील २४ वर्षीय आदिवासी तरुणी कु. शेजल भारत सयाम यांचे, वडेगांव/शंकरपुर येथील ग्रामस्थांनी भारतीय संविधान पुस्तिका, क्रांतीज्योती सावित्री फुले स्मृती चिन्ह व साडी देऊन सन्मानित केले व सत्कार करण्यात आले.
जिल्हास्तरावर ‘क्रांतिसूर्य बिरसा मुंडा सन्मान चिन्हा’ने सन्मानित वीरांगना रणरागिणी शेजल सयाम यांचे सत्कार, कार्यक्रमाचे अध्यक्ष व माजी ग्रा.पं. सरपंच सुरेशकुमार पंधरे, उपाध्यक्ष व माजी ग्रा.पं. सदस्य प्रभू कापगते, प्रमुख पाहुणे व सामा. कार्य. कार्तिक कावळे, विशेष अतिथी व सामा. कार्य. मलिराम सयाम, हेमराज सयाम व रामकृष्ण वाढवे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
प्रसंगी ग्रामस्थ शामराव मडावी, श्यामलाल मरसकोल्हे, कन्हैयालाल बिसेन, आनंदराव उईके, शोभिलाल सयाम, विश्वनाथ कोचे, सुकराम सयाम, हिवराज सयाम, राजकुमार सयाम, जगदीश कोचे, ज्ञानेश्वर टेकाम, घनश्याम कोचे, रेखराम मडावी, अशोक सयाम, लक्ष्मण वाढवे, लक्ष्मण वाढवे, प्रकाश परतेकी, रेवाराम टेकाम, महेंद्र वाढवे, विनोद मडावी, राहुल मरसकोल्हे, क्रांती शहारे, शिवनाथ राऊत, समीर नंदेश्वर व शुभम टेकाम उपस्थित होते.
तर महिला ग्रामस्थ ग्रा.पं. सदस्या लता टेकाम, पार्वता सयाम, शिशू वाढवे, शेवंता सयाम, शकुंतला सयाम, रामेश्वरी वाढवे, मंदा सयाम, उषा सयाम, अर्चना सयाम, शारदा सयाम, ममता मडावी, ज्योती सयाम व दर्शना जुगनायके उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सुरेशकुमार पंधरे, आभार प्रदर्शन शेजल सयाम तर छायाचित्रे हार्दिक टेकाम यांनी टिपले.















