prabodhini news logo
Home ठळक बातम्या महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. राहुल दुबाले यांची सलग तिसऱ्यांदा...

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. राहुल दुबाले यांची सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र राज्य शासन गृह विभाग समितीवर निवड

0
130

शेवगाव प्रतिनिधी- महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. राहुल दुबाले यांची सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र राज्य शासन गृह विभाग पोलीस निराकरण समन्वय समिती सदस्य म्हणून निवड झाल्याची गौरवास्पद बाब नुकतीच जाहीर झाली. त्यांच्या या निवडीमुळे पोलीस बांधवांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण आहे.

राहुल दुबाले हे पोलिस बांधवांच्या विविध समस्या, हक्क व हक्कांचे संरक्षण तसेच त्यांचे कल्याण या कामात सातत्याने पुढाकार घेत असतात. संघटनात्मक बांधणी, सामाजिक भान आणि नेतृत्वगुण यांच्या बळावर त्यांनी आजवर अनेक प्रशासकीय पातळीवर प्रश्न सोडविण्याचे कार्य यशस्वीपणे केले आहे. याच कार्याचा गौरव म्हणून राज्य शासन गृह विभागाने त्यांना सलग तिसऱ्यांदा समितीवर संधी दिली आहे.

या निवडीबद्दल महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना शेवगाव तालुका प्रमुख विकासभैय्या शेलार यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. “दुबाले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बांधवांचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मार्गी लागतील आणि संघटनेचे कार्य अधिक गतीमान होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here