
नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – पुणे – दिनांक 24 ऑगस्ट 2025 ला ग्लोबल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांचे वतीने महाराष्ट्र मधील साहित्यिक, सामाजिक,शैक्षणिक,क्रीडा तसेच सांस्कृतिक इत्यादी विविध क्षेत्रांमध्ये अतुलनीय कार्य करणाऱ्या प्रतिभावान व्यक्तींचा सन्मान व गौरव करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये आद गायत्री अनिल रामटेके, बल्लारपूर जी. चंद्रपूर यांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांनी केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल त्यांना “राज्यस्तरीय ग्लोबल स्टार पुरस्कार” ने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रम चे प्रमुख पाहुणे अध्यक्षा रूपाली चाकणकर (महाराष्ट्र राज्य महिला आयोग) कार्यक्रमांचे उद्घाटक माननीय विजय नाईकल सर क्षेत्रीय कार्या लय पुणे महानगरपालिका ,प्रमुख पाहुणे माननीय युवराज बेलदरे (नगरसेवक) माननीय प्रियांका निकम (पोलीस उपनिरीक्षक भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन) माननीय रुपेश टाकळकर साहेब (डायरेक्टर जॉयझील इंडिया प्रायव्हेट लिमिटेड) याच्या उपस्थितीत.ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, पुणे येथे आद गायत्री ताई अनिल रामटेके यांना “राज्यस्तरीय ग्लोबल स्टार पुरस्कार” ने मानाचे सन्मान पत्र, ट्राफि,शॉल श्रीफळ देऊन गौरवण्यात आले.
आद गायत्री ताई अनिल रामटेके यांनी आतापर्यंत माता रमाई, माता सावित्री बाई फुले आणि माता जिजाऊ साहेब यांच्या जीवनावर आतापर्यंत 160 प्रयोग सादर केलेत. या व्यतिरिक्त इतर वेगवेगळ्या क्षेत्रात तसेच सामाजिक क्षेत्रात खूप मोलाचे कार्य करीत आहेत. आजपर्यंत त्यांनी विविध पुरस्कार प्राप्त केलेले आहे.
या कार्यक्रम ला खूप मोठ्या संख्येने महिला आणि पुरुषाची उपस्थिती होती. मा. गायत्री रामटेके यांना हा सन्मान मिळाल्या मुळे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यामंध्ये,आणि त्याच्या सर्व मित्र मंडळी व चाहत्या वर्गानी आनंद व्यक्त केला आहें..















