prabodhini news logo
Home ठळक बातम्या शंकरपुरच्या चिमुकल्यांनी साकारली “बाप्पांची” मूर्ती !

शंकरपुरच्या चिमुकल्यांनी साकारली “बाप्पांची” मूर्ती !

0
97

प्राणप्रतिष्ठेसाठी कुटुंबियांसह गावकऱ्यांत प्रचंड उत्साह !

साकोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – साकोली – गणेश चतुर्थीच्या शुभपर्वावर शंकरपुर/वडेगांव येथील नऊ चिमुकल्यांनी स्वहस्ते मातीची थेट गणपती बाप्पांची मूर्ती तयार केली आहे; हत्तीचे डोके, दोन मोठे कान, एक तुटलेला दात, एक सोंड, चार हात, मोठे पोट व इतर मानवी शरीराची हुबेहूब कारागिरी केली. तर हातात मोदक घेतलेल्या बाप्पांचे वाहन उंदीर मामासह मूर्तीला शोभिवंत रंग देऊन मूर्ती अजूनचं आकर्षित बनविली आहे.

भूपेश धुर्वे (१६), हर्षिक टेकाम (१६), लोकेश टेकाम (१५), आदित्य परतेकी (१५), अमन सयाम (१४), मोहित मडावी (१४), खेतानसिंग मडावी (१४), दक्ष शेंदरे (११) व मंजित सयाम (९) या शंकरपुरच्या नऊ चिमुकल्यांनी कुठल्याही यंत्रणाचा वापर न करता चक्क आपल्या हस्तकलेने बाप्पांची मूर्ती तयार करून रंग दिलेले आहे. विशेषतः भूपेश धुर्वेनी स्वघरी बाप्पांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी आपल्या पालकांशी हट्ट धरले असता पालकांनी होकार दिले आहे.

शंकरपुर येथे यावर्षी वैयक्तिक वा सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन देखील करण्यात आले नव्हते; अशा परिस्थितीत चिमुकल्यांनी परंपरा कायम राखत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल धुर्वे परिवारासह गावात देखील चिमुकल्यांचे कौतुक केले जात आहे. तर येत्या गणेश चतुर्थीला, २८ ऑगस्ट बुधवार रोजी बाप्पांच्या या अनोख्या प्राणप्रतिष्ठेसाठी गावात आनंदाचा वातावरण पसरला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here