
नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – ग्लोबल फौंडेशन व विद्यानिकेतन संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने वसुधा नाईक यांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला. साहित्यक्षेत्र, कलाक्षेत्र, प्रसार माध्यम, समाजसेविका,उपक्रमशील शिक्षिका, कवयित्री, लेखिका, अशा अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या मॅडम ‘ग्लोबल स्टार पुरस्कार २०२५’च्या त्या मानकरी ठरल्या.
त्यांनी ‘मानव सेवा आश्रम’ पाथर्डी येथील ३५ मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप, महिनाभराचे अन्नधान्य, सणावाराला कपडा लत्ता देऊन सामाजिक बांधिलकी जपलेली आहे.
तसेच ‘आपुलकी वृद्धाश्रम’ आळंदी, ‘निवारा वृद्धाश्रम ‘ धनकवडी, ‘मतिमंद ‘ मुलांची शाळा बारामती इथे त्यांनी आपल्या कुटुंबाचे वाढदिवस अन्नदान करून साजरे केलेले आहेत. असे अनेक समाजउपयोगी उपक्रम नेहमीच चालू असतात. तसेच त्या वृक्षारोपणही करतात. पर्यावरणासाठी सुद्धा काम करतात. सामाजिक बांधिलकी नेहमीच जपतात. अन्याय, अत्याचार,भ्रष्टाचार याविरुद्ध लढा देताना पोलीस मित्र म्हणून काम करतात.
यांच्याबरोबरच आणखी ७५ जणांचा सन्मान करण्यात आला.
हा कार्यक्रम सोहळा पुणे येथे सावित्रीबाई सभागृह, गंजपेठ येथे पार पडला, कार्यक्रमाच्या वेळी अनेक थोर व सन्माननीय प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती लाभली. मा. विजय नाईकल सर (सहाय्यक आयुक्त, कोथरूड वारजे क्षत्रिय कार्यालय ), मा. रुपालीताई चाकणकर (महाराष्ट्र राज्य महिला आयोग )तसेच मा. युवराज बेलदरे (नगरसेवक पुणे महानगरपालिका ),मा. रुपेश टाकळकर (डायरेक्टर जॉयझील इंडिया प्रा.ली.), मा. प्रियांका निकम (पोलीस उपनिरीक्षक), मा. प्रीती संघवी (समाजसेविका) कार्यक्रमास उपस्थित होत्या.















