
अहेरी/आलापल्ली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : अहेरी आणि आलापल्ली येथील रस्त्यांवर अल्पवयीन मुलांकडून वाहतूक नियमांचे होणारे उल्लंघन आणि त्यामुळे वाढलेल्या अपघातांवर तातडीने लक्ष देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) केली आहे. गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष सोनल वाकुलकर यांनी याबाबत अहेरी पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांना पत्र दिले आहे. या पत्रात अल्पवयीन मुलांवर आणि त्यांच्या पालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
बेदरकार वाहनचालनामुळे वाढता धोका
पत्रात सोनल वाकुलकर यांनी म्हटले आहे की, अहेरी आणि आलापल्लीच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी आणि नियमांची पायमल्ली ही एक गंभीर समस्या बनली आहे. विशेषतः अल्पवयीन मुले कोणत्याही वैध परवान्याशिवाय बेदरकारपणे वाहने चालवत आहेत, ज्यामुळे अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.
मनसेने सुचवलेल्या उपाययोजना
या गंभीर स्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मनसेने पोलीस प्रशासनाला काही उपाययोजना सुचवल्या आहेत:
शाळांमध्ये जनजागृती मोहीम: पोलिसांनी वाहतूक विभागामार्फत स्थानिक शाळांमध्ये वाहतूक नियमांबद्दल जनजागृती मोहीम राबवावी. यामुळे विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच नियमांचे महत्त्व समजेल.
पालकांवर कठोर कारवाई: वाहतूक नियम मोडताना आढळणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या पालकांवर कायदेशीर कारवाई करावी. यामुळे पालक आपल्या मुलांना नियम पाळण्यास प्रोत्साहित करतील.
मनसेच्या या मागणीमुळे पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांनी गंभीरता समजून क्षणाचा विलंबन न करता खात्याला कारवाई संदर्भात आदेश देण्यात आले. नागरिकांनीही आपल्या मुलांना वाहन चालवण्यासाठी देण्यापूर्वी नियमांचे पालन करण्यास प्रोत्साहित करावे,पत्र देताना मनसे पदाधिकारी सोनल वाकुलकर (जिल्हा उपाध्यक्ष),प्रणित श्रीरामवार(तालुकाध्यक्ष), राहूल पिट्टलवार, रितेश मोहुर्ले, संतोष गणमुकूलवार, अक्षय कोवे,करण गुरनूले,शिवा रामगिरवार, प्रथम आईंचवार आदि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते..















