prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे विशेष कविता – आगमन गणरायाचे

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे विशेष कविता – आगमन गणरायाचे

0
115

लागली आस तुझ्या ओढीची
बाप्पा गणराया निर्मल आगमनाची..

संकटाला माझ्या तूच बघ तारसी
वाढलेल्या दुःखाला तुच मारिसी…

वंदन माझे मनोभावे मूर्तीला
ढोल गजराच्या त्या रे साथीला…

कर वचन पूर्ती माझ्या शब्दाची
आठवण राहू दे तुला साकड्याची…

शेंदूर गुलाल तो उधळूनी
मनोभावे धावा करता येशी धावून…

सकलजनांचाच तू रे बाप्पा
जन तल्लीन होतात ऐकुनी तुझ्या गप्पा….

सुखाने ठेव तूच सर्वांना,हे गणराया
मागणे तुझ्याच कडेच,पडतो मी पाया…

गणेश चतुर्थीला हे आगमन
प्रसन्न होऊन जाते तन मन…

मोदकाचा भारी तो नैवद्य
गजापती तुझ्या च आवडीचा
मनोमणीच्या अंतर्भावनेने
तुझे नाम घेतो, शुद्ध गणधीशाचा…
तुझे नाम घेतो शुद्ध गणाधीशाचा…

कवी गायकवाड मनोज रामचंद्र.
शहापूर ठाणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here