prabodhini news logo
Home चंद्रपूर ई- पीक पाहणी विहित मुदतीत पूर्ण करा

ई- पीक पाहणी विहित मुदतीत पूर्ण करा

0
98

चंद्रपूर, दि. 2 : महसूल विभागाचा ई-पीक पाहणी प्रकल्प 15 ऑगस्ट 2021 पासून संपुर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या सुचनेनुसार या प्रकल्पात सुधारणा करून रब्बी हंगाम 2024 पासून पीक पाहणी ही डिजिटल क्रॉप सर्वे प्रणालीद्वारे संपूर्ण राज्यात लागू करण्यात आली आहे.
सद्या खरीप हंगामातील ई- पीक पाहणीची कार्यवाही सुरू आहे. खरीप हंगाम -2025 साठी ई-पीक पाहणी डीसीएस मोबाईल ॲपचे व्हर्जन 4.0.0 अद्यावत स्वरुपात गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ॲप अपडेट करून घ्यावे.
खरीप हंगामातील शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणी 1 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2025 या कालावधीत तर सहाय्यक स्तरावरील पीक पाहणी 15 सप्टेंबर ते 29 ऑक्टोबर 2025 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. तथापि, शेतकऱ्यांनी सहाय्यकांवर अवलंबून न राहता शक्यतोवर ई- पीक पाहणी स्वतःच पूर्ण करावी, पीक पाहणी दरम्यान काही अडचणी आल्यास आपल्या गावासाठी नेमणुक करण्यात आलेले ई-पीक पाहणी सहायक पहिल्या दिवसापासून शेतकऱ्यांच्या मतदीसाठी उपलब्ध असतील. त्यामुळे त्यांनी खरीप हंगाम 2025 ची ई-पीक पाहणी शासनाने दिलेल्या विहीत मुदतीत पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here