
पुणे प्रतिनिधी:पुणे करांची लाडकी मेट्रो सार्वजनिक वहातूकी मध्ये महत्वपूर्ण स्थान प्राप्त केले आहे. पुण्यातील श्री गणेशोत्सवात महत्वपूर्ण योगदान दिले आहे .
या ठिकाणी कार्यरत कामगारांनी एकत्रित येऊन आपल्या न्याय्य हक्कांसाठी भारतीय मजदूर संघ संलग्नीत संघटनेत सहभागी होण्याचा निर्धार केला . नुकतीच पुणे मेट्रो रेल कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) ही संघटनेला नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.
दि १२ सप्टेंबर २०२५ रोजी मा अपर कामगार आयुक्त श्री बाळासाहेब वाघ, मा सह्यायक कामगार आयुक्त तथा रजिस्टार मा श्रीमती तं श अत्तार यांनी पुणे मेट्रो रेल कामगार संघ रजिस्टर नंबर पी एन ५२९९दि १०सप्टेंबर२०२५ संघटना नोंदणी प्रमाणपत्र भारतीय मजदूर संघ व पुणे मेट्रो रेल कामगार संघाच्या पदाधिकाऱ्यां प्रदान करण्यात आले.
या वेळी अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघ सरचिटणीस, भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सचिन मेंगाळे, पुणे मेट्रो रेल कामगार संघ अध्यक्ष राम सुरवसे,उपाध्यक्ष-यश निंबाळकर,सुवर्णा जॉन,कोषध्यक्ष-राज शेलार सचिव-रवींद्र वाघोले,निकिता दंडवते,लक्ष्मण गवस, विठ्ठल जोगदंड, सविता गायकवाड, शिल्पा बनसोडे, गोरख शिंदे, रेखा फडके, गौरी साळुंके, कामगार उपस्थित होते.















