
जयेंद्र चव्हाण
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
मो.9665175674
भंडारा – शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर, संत आणि महामानवांच्या विचारांचे अभ्यासक. त्यावर लेखन करणारे आणि व्याख्यानाच्या माध्यमातून त्यांचा विचार जनमाणसापर्यंत पोहोचविण्याचे काम करणारे तुमसर नगरीतील आणि सध्या मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष असलेले अनिल भुसारी यांची गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या “महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज अध्यासन” समितीवर सदस्य म्हणून निवड करण्यात आलेली आहे.
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी पाठवलेल्या पत्रकात अनिल भुसारी यांच्यासह बाबा भांड आणि इतर बारा सदस्यांची निवड करण्यात आलेली आहे. विद्यापीठाच्या अध्यासन समितीवर त्यांना महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक आणि महान विचारवंत बाबा भांड यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. ही तुमसर आणि भंडारा जिल्हा करिता आनंदाची बाब आहे.
महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज अध्यासन समितीवर अनिल भुसारी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या तर्फे अभिनंदन करण्यात आले. त्यांनी या निवडीचे श्रेय विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. दिलीप चौधरी आणि विद्यापीठाच्या प्रशासनास दिलेले आहे.















