prabodhini news logo
Home ठळक बातम्या मिरा-भाईंदरमध्ये “Plog Run 2025” ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मिरा-भाईंदरमध्ये “Plog Run 2025” ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
125

मोजीस परमार
विशेष जिल्हा प्रतिनिधी, ठाणे
प्रबोधिनी न्युज नेटवर्क

मिरा-भाईंदर महानगरपालिकेतर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत गुरुवारी “Plog Run 2025” हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. शहरातील विविध विभागांत एकाच वेळी आयोजित या प्लॉग रनला नागरिक, विद्यार्थी, स्वयंसेवक आणि सामाजिक संस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या उपक्रमाचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त प्रशासक श्री. राघवेंद्र. एस. शर्मा (भा.प्र.से.) यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यांनी नागरिकांना स्वच्छतेबाबत जागरूक राहण्याचे आणि स्वच्छ मिरा-भाईंदरसाठी आपला सक्रीय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले.

गोल्डन नेस्ट परिसरासह नवरंग नगर हनुमान मंदिर, दीपक हॉस्पिटल रोड, एस.के. स्टोन परिसर अशा विविध ठिकाणी सकाळी ७.३० वाजल्यापासून प्लॉग रन पार पडले. या ठिकाणी कचरा वेचून नागरिकांनी स्वच्छतेबाबत चांगला संदेश दिला.

या उपक्रमात मनपा अधिकारी, विविध NGO, विद्यार्थी, स्वयंसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. माहिती आणि जनसंपर्क अधिकारी राज धरते यांच्यासह अनेक विभाग प्रमुख आणि कर्मचारी उपस्थित होते.

महानगरपालिकेने या उपक्रमात सहभागी सर्व संस्था व नागरिकांचे आभार मानले असून पुढेही अशाच प्रकारे सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here