prabodhini news logo
Home ठळक बातम्या खेळाडूंनी राज्याचे नाव लौकिक करावे – आमदार राजु कारेमोरे

खेळाडूंनी राज्याचे नाव लौकिक करावे – आमदार राजु कारेमोरे

0
124

भंडारा येथे २६ ला राज्यस्तरिय तलवारबाजी स्पर्धेचे थाटात उद्घाटन

जयेंद्र चव्हाण
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
मो.9665175674

भंडारा – येथील राज्यस्तरिय तलवारबाजी स्पर्धेचे प्रतिनिधी करण्यासाठी खेळाडूंना रात्रंदिवस मेहनत घेतली. त्याचे फलित म्हणजे खेळाडूंनी आपल्या जिल्हृयाचे नाव लौकीक करण्यासाठी जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास अंगी बाळगुन यश संपादन करावे आणि पुढील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर राज्य व देशाचे नाव लौकिक करावे असे प्रतिपादन आमदार राजुभाऊ कारेमोरे यांनी केले. ते भंडारा जिल्हा तलवारबाजी असोसिएशन भंडाराच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल भंडारा येथील बॅटमिंटन हॉल येथे आयोजित तीन दिवशीय ३३ व्या ज्युनियर राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करतांना बोलत होते.

स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार सुनिल मेंढे व आमदार राजू कारेमोरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टोकीयो ऑलंपिक निरिक्षक अशोक दुधारे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी लतीका लेकुरवाडे, स्नेहल चौगुले, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त राजेंद्र भांडारकर, महाराष्ट्र असो. सचिव उदय डोंगरे, महाराष्ट्र असो. उपाध्यक्ष प्रकाश काटोळे, महाराष्ट्र असो. कोषाध्यक्ष राजकुमार सोमवंशी, महाराष्ट्र असो. बुलढाणा सचिव शेषनारायण लोढे, सामाजिक कार्यकर्ता जॅकी रावलानी, जिल्हा प्रतिनिधी गोपालकृष्ण मांडवकर, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम, प्रशांत देसाई, नितीन कुथे, क्रीष्णा उपरिकर, एकविध क्रीडा संघटनेचे अध्यक्ष सुर्यकांत इलमे, तिरंदाजी संघटनेचे सचिव आशिक चुटे, भंडारा तलवारबाजी असोसिएशनचे संजीवकुमार बांडबुचे, राजेन्द्र भांडारकर, सुनिल कुरंजेकर, क्रीडा प्रतिनिधी विलास केजरकर, सत्यवान गौरी, हेमंत गभणे, राजेश हुकरे, नरेश वाढई, धनश्याम बैस, शशिकांत जोगेकर, माला बगमारे, साधना त्रिवेदी, अविनाश निंबार्ते, आकाश गायकवाड, प्रतिक लाडे, पराग गावंडे, निखिलेश तभाने, शोऐब अंसारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.त्यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, मार्ल्यापण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.संघटनेच्या वतीने उपस्थित मान्यवरांना स्मृतिचिन्ह व रोपटे देऊन स्वागत व सत्कार करण्यात आले.

माजी खासदार सुनिल मेंढे यांनी खेळाडूचे जिवन पध्दतीने जवळून पाहिले आहे. ऊन, वारा, पाऊस, हिवाळा या ऋतुची पर्वा न करता अभ्यासाबरोबर मैदानावर कमालीची कामगिरी करावे लागते असे मत व्यक्त केले. मान्यवरांनी खेळाडूंना विविध मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले. व पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.या दरम्यान तलवारबाजी ज्युनियर स्पर्धेत राज्यातील २८ जिल्ह्यातील संघांनी भाग घेतला आहे. त्यात ४०० च्यावर खेळाडू, संघटनेचे पदाधिकारी, पंच, क्रीडा शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

स्पर्धेचे पंच सागर मगरे, पेरिया स्वामी, तुषार आहेर, भूनेश नागोसे, जयदीप पांढरे, वजिरोद्दीन काझी, विशाल पवार, अजय त्रिभूवन, प्रफुल्ल जगताप, राहुल मांडवकर, सौरभ तोमर, स्वप्निल तांगडे, पायल मोरांकर, खल्लील शेख यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.
सांघिक ईपी प्रकार
मुले छत्रपती संभाजी नगर, सोलापूर, लातुर, सांगली या संघाने अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय व चतुर्थ क्रमांक पटकावला आहे.
सांघिक फाईल छत्रपती संभाजी नगर, धाराशिव, बिड, बुलढाणा,
वैयक्तिक ईपी
यश वाघ छत्रपती संभाजी नगर, महेश तेलतेमळे सातारा, सिंधात विधाते धाराशिव, पाउरश देशमुख बुलढाणा,
फाईल रोहन शहा, तेजस पाटील, स्वराज डोंगरे सर्व राहणार छत्रपती संभाजी नगर, कार्तिक चटप बीड,
सांघिक ईपी प्रकार
मुली
लातूर, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, सोलापूर,
वैयक्तिक ईपी
जान्हवी जाधव लातुर, विधी पाटील पुणे, माही अराडवाड लातुर, सृष्टी जाधव सातारा,
फाईल सांघिक प्रकार
छत्रपती संभाजी नगर, पुणे, सोलापूर, भंडारा या प्रमाणे संघ, वैयक्तिक या संघाने अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय व चतुर्थ क्रमांक पटकावला आहे. तसेच वैयक्तिक प्राविण्य प्राप्त केलेले आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निशिकांत इलमे व प्रास्ताविक भंडारा जिल्हा तलवारबाजी असोसिएशनचे सचिव सुनील कुरंजेकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार सौरभ तोमर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता निखिल कोहाड, जय भोयर, प्रबल कडव, चेतन वाकेकर, धिरज राजपूत, निलोफर पठाण, मेघा गिरडकर, तन्नु डुंभरे, मयुर इलमे, अत्ता खान, अमन वैरागडे व भंडारा जिल्हा तलवारबाजी असोसिएशनच्या पदाधिकारी, खेळाडूंनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here