
रामगोपाल अट्टेला तालुका विशेष प्रतिनिधी सिरोंचा: सेवा पंधरवाडा अभियान अंतर्गत दि.17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती 02 आक्टोंबर 2025 दरम्यान राज्यात महासूल विभाग ” सेवा आपला दारी ” विशेष शिबीर आयोजित करण्यात येत असून या उपक्रम टप्पा- 3 मध्ये कस्तुरबा गांधी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात तहसील कार्यालय सिरोंचा सामान्य प्रशासन विभागामार्फत आयोजित या विशेष शिबिरात वर्ग 9 ते 12 वी पर्यंत शालेय विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र, आधिवास प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र,उत्पन्न प्रमाणपत्र तयार करणे व वाटप करणे, या शिबिराचा मुख्य उद्देश आहे. या शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी माननीय निलेश होनमोरे (तहसिलदार सिरोंचा) बोलत होते की, जसे, आपल्याला भूक लागल्यावर आपण अन्नाच्या शोधात असतो, आणि अन्न सेवन करून भूक हे मानवी गरज पूर्ण करतो. परंतु कागदपत्रे असे आपल्याला पाहिजे तेव्हा मिळू शकत नाही, तर आपल्याला जातीचा दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र हवे असल्यास बंदोबस्त मिसल, पी 1,अधिकार अभिलेख पंजी पासून तर जन्मदाखला, टीसी, गृहकर पावती असे अनेक कागदपत्र गोळा करावे लागतात, तेव्हा जातीचा दाखला मिळू शकतो, मग विद्यार्थ्यांना अहिन वेळेवर कधीकधी असे महत्त्वाचे प्रमाणपत्र उपलब्ध होऊ शकत नाही. त्या करीताच विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशेत असतानाच हे प्रमाणपत्र उपलब्ध करून दिल्यामुळे नोकरीसाठी, विविध शासकीय योजनेसाठी ते प्रमाणपत्र उपयोगी पडतात. त्यासाठी हे आमचं प्रशासनाचा मानस आहे. अनुक्रमे अनुसुचित जातीचे नवबौद्ध मुलींची निवासी शाळा, जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय असे टप्प्यात अभियान राबविण्यात येत आहे,पुढे ते विद्यार्थिनींना उद्देशून प्रेरणादायी मार्गदर्शनात भारताचे पहिले महिला राष्ट्रपती श्रीमती. प्रतिभा देवीसिंग पाटील ते सध्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू , सावित्रीबाई फुले या महिलांचे आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपला निश्चित ध्येय व यश प्राप्त करावे, व शिक्षणाचे महत्त्व यावर अधोरेखित केले. त्यावेळी उपस्थित महसूल विभागातील तोटावर नायब तहसीलदार, खोब्रागडे साहेब मंडल अधिकारी, एम. बी.पदा तलाठी सिरोंचा , सेतू केंद्र चालक आपल्या संचासहित उपस्थित, या शिबिरादरम्यान विद्यालयाचे पात्र एकूण 36 विद्यार्थिनींना, 22 जातीचे प्रमाणपत्र साठी, अधिवास 22, उत्पन्न दाखला करिता 13 विद्यार्थिनी नोंदणी करण्यात आले.या शिबिरादरम्यान विद्यार्थिनींचे शालेय अभिलेखातील जसे, स्पेलिंग,आधार कार्ड वरील जन्म दिनांक व जन्मदाखलावरील तारीख महिना व वर्ष पडताळणीसाठी शिक्षिका. श्रीमती.एम. टेंभुर्णे यांनी सहकार्य केले . संचालन , कु.एम. एन.रॉय यांनी तर आभार जे.डी रामटेके यांनी मानले. या शिबिराच्या निमित्ताने पात्र विद्यार्थी, विद्यार्थीचे कागदपत्र आणलेले पालक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते, यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंद, आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.












