prabodhini news logo
Home चंद्रपूर ब्रम्हपुरी शहरात रामायण रचिता महर्षी वाल्मिकी जयंती उत्सव व शोभायात्रा उत्साहात साजरी

ब्रम्हपुरी शहरात रामायण रचिता महर्षी वाल्मिकी जयंती उत्सव व शोभायात्रा उत्साहात साजरी

0
346

नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – ब्रम्हपुरी- शहरातील महर्षी वाल्मिकी जयंती उत्सव समिती, महर्षी व्यास नागरी पथसंस्था ब्रम्हपुरी आणि महर्षी व्यास बहुउद्देशिय संस्था ब्रम्हपुरी यांच्या सयुक्त विद्यमाने जुना मच्छी मार्केट, कोट तलाव बाजार चौक येथे रामायण रचिता आदिकवी महर्षी वाल्मिकी जयंती व शोभायात्रा दिनांक ७ आक्टोंबर रोज मंगळवारला मोठ्या उत्साहात आणि आनंददायी वातावरणात साजरी करण्यात आली. समाजातील एकतेचा आणि ज्ञानाचा संदेश देणाऱ्या या जयंती सोहळ्यास परिसरातील समाजबांधवाचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला.
सर्वप्रथम कार्यक्रमाचे उद्घाटक चिमूर विधानसभा क्षेत्राचे मा. आमदार बंटीभाऊ भांगडीया व प्रमुख पाहुणे यांचे हस्ते रामायण रचिता आदिकवी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन व पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर समाजाच्या वतीने मा.आमदार बंटीभाऊ भांगडीया,मा. चंद्रलाल मेश्राम माजी न्यायाधीश,मा. श्रीधर शेंडे यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार व स्वागत करण्यात आले.

“यावेळी समाजाला संबोधित करताना भोई ढिवर समाज महर्षी वाल्मिकीच्या जयंतीनिमित्ताने विखुरलेला समाजबांधव एकत्रित आल्याचे पाहून खूप आनंद झाला. समाज अशाप्रकारे एकत्र आल्याने समाजाची ताकद वाढुन समाज उन्नती व विकास वाढिस चालना मिळते. थोर पुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी समारंभामुळे थोर महात्मे यांचे विचार आपल्या पर्यंत पोहचून आपले विचाराचे परिवर्तन घडून येते. आपल्या जीवनाचे आपणच शिल्पकार होवू शकतो. म्हणून महर्षी वाल्मिकीजींचे यांचे विचार आपल्या अंगी आत्मसात करा.असे यावेळी समाजाला मार्गदर्शन करताना आमदार मा. बंटीभाऊ भांगडीया यांनी व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. चंद्रलाल मेश्राम, संचालक महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघटना तथा माजी मागासवर्गीय आयोगाचे सदस्य, उद्घाटक म्हणून मा. बंटीभाऊ भांगडीया आमदार चिमूर विधानसभा सदस्य, प्रमुख वक्ते मा. श्रीहरी शेंडे, सचिव चंद्रपूर जिल्हा भोई समाज सेवा संघ, मा. यशवंत दिघोरे, संचालक चंद्रपूर जिल्हा सहकारी बँक, छाया मंडरे सेवानिवृत्त शिक्षिका, प्रभाकर मांडरे नागभीड, विलास विखार, क्रिष्णा सहारे, दिपकजी उराडे, गणेश तर्वेकर, सुधिर दोनाडकर, आवेश पठाण, स्मीता पारधी, संजय गजपुरे, आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद दिघोरे यांनी केले, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आंनद शिऊरकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन व्यंकटेश चाचरकर यांनी केले.
यावेळी परिसरातील बहुसंख्येने समाज बांधव कार्यक्रमास उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here