prabodhini news logo
Home ठळक बातम्या राष्ट्रीय पुरस्कार विजेती बालकलाकार कु. त्रिशा ठोसरचा मीरा-भाईंदर महानगरपालिकेत गौरव!

राष्ट्रीय पुरस्कार विजेती बालकलाकार कु. त्रिशा ठोसरचा मीरा-भाईंदर महानगरपालिकेत गौरव!

0
101

मोजीस परमार
विशेष जिल्हा प्रतिनिधी, ठाणे
प्रबोधिनी न्युज नेटवर्क
8104170564
mojissports@gmail.com

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीतील राहणारी बालकलाकार कु. त्रिशा ठोसर हिने ‘माझा’ या मराठी चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी भारत सरकारकडून राष्ट्रीय बालकलाकार पुरस्कार (राष्ट्रपती पुरस्कार) मिळवला आहे.
या यशाबद्दल मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त मा. राजीवजीनाथ ए. झा (भा.प्र.से.) यांनी त्रिशाचा शाल, सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार केला.

या गौरवप्रसंगी आयुक्तांनी त्रिशाच्या पालकांचे आणि गुरूजनांचे अभिनंदन करून तिच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या.
त्रिशाने हा सन्मान आपल्या गुरूंना, पालकांना आणि शहराला अर्पण करताना सांगितले की, हे तिच्यासाठी अत्यंत अभिमानाचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here