prabodhini news logo
Home चंद्रपूर चंद्रपूर येथील CIPET, इंस्टीट्यूट ला बल्लारपुर इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग...

चंद्रपूर येथील CIPET, इंस्टीट्यूट ला बल्लारपुर इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाची औद्योगिक भेट

0
142

बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बल्लारपूर यांच्या यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातर्फे दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ रोजी सेंट्रल इंस्टीट्यूट ऑफ प्लास्टिक इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (CIPET), चंद्रपूर येथे औद्योगिक भेट आयोजित करण्यात आली.

या भेटीचे नेतृत्व यांत्रिकी अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. प्रशांत वालके सर यांनी केले. त्यांच्या सोबत प्रा. मोहसिन कुरेशी सर, प्रा. हरिदास गंडाटे सर तसेच गैर-शिक्षक कर्मचारी धनंजय पाठक, प्रतीक पाठक आणि नितीन गिलबिले उपस्थित होते. या भेटीत एकूण ७६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

या औद्योगिक भेटीदरम्यान बी.टेक. आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांना प्लास्टिक प्रोसेसिंगसंबंधी यंत्रसामग्री, चाचणी (Testing), टूल रूम तसेच CAD-CAM तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती देण्यात आली. या अनुभवामुळे विद्यार्थ्यांना उद्योगातील आधुनिक प्रक्रिया व तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष ओळख मिळाली.

या भेटीच्या यशस्वी आयोजनासाठी आणि सहकार्याबद्दल CIPET, चंद्रपूर येथील पुष्कर सर, शरद सर आणि पंकज सर यांचे प्रा. प्रशांत वालके सर यांच्या कङून विशेष आभार मानण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here