
ग्रा. पं. सदस्या लता टेकाम यांच्या हस्ते धम्मध्वजारोहण..
साकोली प्रतिनिधी – साकोली १५ ऑक्टोंबर २०२५ तालुक्यातील शंकरपुर/वडेगांव येथे ६९ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिम्मित्त, १४ ऑक्टो. रोजी बौद्ध विहार शंकरपुर येथे पाहुण्यांच्या वतीने तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तर ग्रा. पं. सदस्या लता टेकाम यांच्या हस्ते पंचशील झेंड्याचे धम्मध्वजारोहण कार्यक्रम पार पडले.
दरम्यान, माजी ग्रा. पं. सदस्य दिलीप राऊत, जगदीश कोचे, घनश्याम कोचे, विलास साखरे, धनराज कोचे, क्रांतीकुमार शहारे व समीर नंदेश्वर यांच्या प्रमुख उपस्थितीत बौद्ध धर्माच्या समस्त अनुयायांनी बुद्ध वंदना करून २२ प्रतिज्ञांचे ग्रहण केले. प्रमुख पाहुणे सचिन सोनवाने यांनी मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाचे सूत्र-संचालन जगदीश कोचे यांनी केले.
प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा ग्रा.पं. सदस्या लता टेकाम तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी ग्रा. पं. सदस्या लता सयाम, से.सो. सदस्या श्यामकला सयाम, माजी वनरक्षक माणिकराम टेकाम, माजी वनरक्षक उमराव मडावी, श्यामलाल मरसकोल्हे, कन्हैयालाल बिसेन, यशवंत परतेकी व रेवाराम टेकाम तसेच समस्त बौद्ध धर्माचे अनुयायी व शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.















