
आमदार विजय वडेट्टीवार यांच्या निधीतून रु. ३ लाख रुपये मंजूर
रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज
ब्रम्हपुरी – ब्रम्हपुरी तालुक्यातील चौगान या सर्वात शिक्षित व ‘सैनिकांचे गाव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यपरंपरेला आणि जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या भक्तिपरंपरेला सन्मान देणारे ‘शक्ती–भक्ती स्मारक’ चौगान येथे उभारण्यात आले असून स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या स्मारकाचे सुशोभीकरण करण्यासाठी ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार व माजी मंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांनी आपल्या विकास निधीतून रु. ३ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
या सुशोभीकरणाच्या कामाच्या भूमिपूजनाचा सोहळा दिनांक १२ नोव्हेंबर २०२५ रोजी ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके यांच्या शुभहस्ते पार पडला.
स्मारकाच्या निर्मितीपासून ते सुशोभीकरणापर्यंत आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांचे सातत्यपूर्ण सहकार्य लाभले आहे. स्मारकाच्या सौंदर्यवृद्धीसाठी निधीची आवश्यकता असल्याचे शक्ती–भक्ती स्मारक समितीच्या वतीने तालुकाध्यक्ष खेमराज तिडके यांना कळविण्यात आले होते. त्यांनी तत्काळ पुढाकार घेत आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याकडे मागणी सादर केली. त्यांच्या प्रयत्नांमुळे वडेट्टीवार साहेबांनी रु. ३ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. या सहकार्याबद्दल शक्ती–भक्ती स्मारक समिती, शिवप्रेमी व ग्रामस्थांनी आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांचे मनःपूर्वक आभार मानले.
या भूमिपूजन सोहळ्यावेळी ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राजेश कांबळे, माजी पोलिस पाटील किशोर तिडके, प्रा. डी.के. मेश्राम, स्मारक समितीचे सल्लागार धनराज बुराडे, युवक काँग्रेसचे अमित कन्नाके, ब्रम्हपुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिवाकर मातेरे, किशोर राऊत, सेवा सहकारी सोसायटी चौगानचे माजी अध्यक्ष अनिल पिलारे, सदस्य श्रीहरी बुराडे, तसेच शक्ती–भक्ती स्मारक समितीचे अध्यक्ष संतोष पिलारे, सचिव हिवराज आठोळे, सदस्य भगवान प्रधान, उमेश भुरके, सचिन राऊत, सुरज देव्हारी, गौरव गुणशेट्टवार आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.















