
स्मशानभूमी वाचवण्यासाठी ‘बोर्ड’ लावून निषेध
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – महाकाली कॉलरी चंद्रपूर येथील परिसरातील अमराई स्मशानभूमीच्या जागेवर होत असलेल्या अवैध अतिक्रमणाविरोधात आज गुरुवार १३ नोव्हेंबर २०२५ रोजी परिसरातील नागरिकांनी एकत्र येत तीव्र निषेध केले. ‘स्मशान भूमी बचाव या हाकेला प्रतिसाद देत नागरिकांनी अतिक्रमकांना जोरदार विरोध केला आणि आपली सामूहिक जागा वाचवण्यासाठी ठोस पाऊल उचलले.
काय आहे प्रकरण?
काही समाजकंटकांनी अमराई स्मशानभूमीच्या जागेवर डोजरच्या साहाय्याने अतिक्रमण करून जागेची विक्री सुरू केल्याची गंभीर बाब १० नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आली.
यावेळी स्मशानभूमीमध्ये सिमेंटचे खांब, टीनचे शेड तयार करणे आणि जुन्या समाधी तोडण्याचे प्रकारही सुरू होते. माहिती मिळताच नागरिक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी हे अतिक्रमण त्वरित हटवले.
आजचे आंदोलन आणि निषेध करण्यात आले.
भविष्यात अशा प्रकारच्या अतिक्रमणाच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी परिसरातील सजग नागरिकांनी आज सकाळी १० वाजता महाकाली कॉलरी कॅन्टींग चौक येथे एकत्र येऊन पुढील दिशा ठरवली.
सर्व नागरिक एकत्रपणे स्मशानभूमी परिसरात गेले आणि त्यांनी आपल्या हक्काची जागा सुरक्षित करण्यासाठी ‘फलक (बोर्ड)’ लावण्यात आले.
या फलकांवर स्पष्ट मजकूर होता.
“ही जागा स्मशान भूमीची आहे. इथे कोणी अतिक्रमन करू नये! अतिक्रमन केल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.”
सकाळी ११ वाजता हा फलक लावून महाकाली कॉलरीच्या लोकांनी अतिक्रमणाविरोधात आपला (निषेध दर्शविला) व्यक्त केला.
निवेदक किशोर डी. मडगुलवार यांनी परिसरातील सर्व बंधू-भगिनींना आवाहन केले होते की, त्यांनी वेळात वेळ काढून या आंदोलनात सहभागी व्हावे, जेणेकरून स्मशानभूमी आपल्या हक्काची आहे, हा संदेश स्पष्ट होईल.
जनतेची मागणी:
महाकाली कॉलरी परिसरातील नागरिकांनी या माध्यमातून प्रशासनाकडे मागणी करण्यात येणार आहे.
त्यांनी या स्मशानभूमीच्या जागेची तात्काळ मोजणी करावी, अतिक्रमकांना योग्य दंड आकारावा आणि भविष्यात असे प्रकार होणार नाहीत, यासाठी ठोस सुरक्षा उपाययोजना कराव्यात.
अखेरीस महाकाली कॉलरीतील लोकांनी एकत्र येऊन स्मशानभूमी वाचवण्यासाठी केलेल्या या सामूहिक प्रयत्नांची चर्चा परिसरात होत आहे.















