prabodhini news logo
Home ठळक बातम्या अस्थायी सब-स्टाफ कामगारावर अन्याय ; युनियन बँक अंकली शाखेविरुद्ध वंचित बहुजन माथाडी...

अस्थायी सब-स्टाफ कामगारावर अन्याय ; युनियन बँक अंकली शाखेविरुद्ध वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन आक्रमक

0
279

सांगली : युनियन बँक ऑफ इंडिया (पूर्वाश्रमीची कॉर्पोरेशन बँक) शाखा अंकली येथे २०१८ पासून प्रामाणिक सेवा देणारे अस्थायी सब-स्टाफ कामगार ऋषिकेश राजू कांबळे यांना दिनांक १५ डिसें.२०२३ रोजी बेकायदेशीरपणे सेवेतून कमी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या अन्यायाविरोधात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा समन्वयक रावसाहेब सराटे यांनी युनियन बँक मुख्य शाखा सांगली यांना वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीने अधिकृत तक्रार-निवेदन देण्यात आले.
कामगार ऋषिकेश राजू कांबळे यांनी दरवर्षी २४० हून अधिक दिवस सेवा पूर्ण केली असून ते औद्योगिक विवाद कायदा १९४७ अन्वये “सातत्यपूर्ण सेवा” धारण करत होते. “Maintain Status Quo of Shri Rushikesh Kamble” असा वरिष्ठांचा स्पष्ट आदेश असतानाही स्थानिक शाखा व्यवस्थापकांनी मनमानी करत त्यांना सेवेतून कमी केले.
अनुसूचित जातीतील या कामगारावर झालेला अन्याय अत्यंत गंभीर असून, कुटुंब उपजीविकेच्या संकटात सापडले आहे. याप्रकरणी योग्य न्याय झाला नाही, तर धरणे आंदोलन सुरू करू असा इशारा वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनने दिला.
२६ नोव्हेंबर पासून (संविधान दिन) युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा अंकली येथे शाखेच्या आवारात पिडीत कामगार, ऋषिकेश राजू कांबळे व त्यांच्या कुटुंबासह बेमुदत शांततामय धरणे आंदोलन करण्यात येईल.
युनियनने स्पष्ट केले आहे की, “आमचे आंदोलन कोणत्याही व्यक्तीविरुद्ध नसून अन्यायी प्रवृत्ती आणि बेकायदेशीर निर्णयांविरुद्ध आहे.”
वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या प्रमुख मागण्या –
1. ऋषिकेश राजू कांबळे यांची तत्काळ सेवेत पुनर्स्थापना
2. बेकायदेशीर कमी केल्यानंतरचा थकबाकी वेतन, बोनस व इतर लाभ
3. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या शाखा व्यवस्थापकांवर शिस्तभंग कारवाई
4. औद्योगिक विवाद कायदा आणि 12th Bipartite Settlement नुसार न्याय
यावेळी, संजय भूपाल कांबळे, सांगली जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष जगदिश कांबळे, जिल्हा महासचिव अनिल मोरे सर, जिल्हा उपाध्यक्ष किशोर आढाव, महानगरपालिका अध्यक्ष युवराज कांबळे, मिरज तालुका अध्यक्ष असलम मुल्ला, कुपवाड शहर अध्यक्ष बंदेनवाज राजरतन, मिरज शहर अध्यक्ष इसाक सुतार यांच्या सोबत पिडित कर्मचारी ऋषिकेश राजू कांबळे आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here