prabodhini news logo
Home चंद्रपूर विकास, न्याय, स्थानिक प्रश्न आणि जनतेच्या मूलभूत सुविधा यावर लक्ष केंद्रित करून...

विकास, न्याय, स्थानिक प्रश्न आणि जनतेच्या मूलभूत सुविधा यावर लक्ष केंद्रित करून निवडणुकीला सामोरे जा.

0
111

भाजप कार्यकर्ते बब्बु खान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश!

आज चिमूर येथे नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी प्रत्येक प्रभागातील बूथ पातळीवर मजबूत संघटन आणि तंतोतंत नियोजन करण्याची गरज असल्याचे नमूद केले.
प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचविण्यासाठी डोअर-टू-डोअर मोहिमेला वेग देणे, स्थानिक प्रश्नांवर आधारित घोषणापत्राची प्राथमिक रूपरेषा तयार करून युवा व नवमतदारांपर्यंत अधिक संपर्क वाढवण्यासाठी विशेष भर यांसह महिलांच्या सहभागासाठी स्वतंत्र कार्यक्रमांची आखणी करण्याच्या सूचना दिल्या.
ही निवडणूक जनतेचा अपार विश्वास जिंकण्याची संधी आहे. आपण सर्वांनी एकदिलाने, सुयोजित पद्धतीने आणि जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेऊन मैदानात उतरा, काँग्रेसच्या विचारांवर जनतेचा विश्वास असून विजय आपलाच आहे.
तसेच यावेळी प्रभागनिहाय आढावा घेत प्रचार आराखडा, सभा, जनसंपर्क आणि सद्यस्थितीची माहिती घेऊन महत्त्वपूर्ण सूचना केल्या.
यावेळी काँग्रेस ओबीसी सेल प्रदेश संघटक धनराज मुंगले, विजय गावंडे, गजानन बुटके, माधव डीरजे, जुनैद खाँन, अविनाश अगडे, राजेंद्र लोणारे, ऋषी वैद्य, मनीष नंदेश्वर, सुधीर पंदिलवार तसेच काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, प्रभागनिहाय उमेदवार, समन्वयक, युवक व महिला आघाडीचे प्रतिनिधी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here