
चकोराची चंद्रकोर
लुकलुकते नभात
सुखाचा चंद्रप्रकाश
आला माझ्या जीवनात।।१।।
चंद्राची मी ग चांदणी
नाही भानही उरले
अवती भोवती छान
शृंगारही अंतरले।।२।।
निळ्या आकाशी दिसते
खुलून माझा ग साज
गर्व वाटते मजला
मी स्वर्गाची राणी आज।।३।।
अवती भोवती तारे
निळे माझे नभांगण
चंदना परी खुलेले
आज माझे हे जीवन।।४।
बिसरून गेले सारे
सुख स्वप्नात मी दंग
उभा चांदोबा सोबती
फुले जीवनाचे रंग।।५।।
कले कलेने फुलते
जसा पैठणीला मोर
तसी चंद्रालाही शोभे
त्याची नाजूक चकोर।।६।।
प्रा. समिंदर निवृत्तीराव शिंदे, लातूर















