
ऋतू आला गारव्याचा
अंगी घालू गरम बंडी
पेटवू या शेकोटी
अंगाला झोंबते गुलाबी थंडी…..
काळ्या कसदार जमिनीतून
मोत्याचे पिकवले दाणे
जोडणी मळणी करता
गातो थंडीत गाणे….
ऋतुचक्राचा हा फेरा
दोडकी रताळी खाऊ
प्रोटीन अंगासाठी
मग थंडीच्या वाटे जाऊ….
सर्जा राजा ढवळ्या पवळ्या जोडी
मळणीलाही लावता
काठी खांद्यावर घेऊन
आनंद वाटे येरझारा घेता…
एक सुंदर आयुष्य
डोईवर निरभ्र आकाश
महिना थंडीचा गोडीने
घोट घेतो चहाचा सावकाश…
गायकवाड मनोज रामचंद्र ©
शहापूर जिल्हा ठाणे.















