
पोंभुर्णा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे च्या समतादूत प्रकल्पा अंतर्गत तालुका पोंभुर्णा, जिल्हा चंद्रपूर च्या वतीने महासंचालक सुनील वारे, विभाग प्रमुख बबन जोगदंड,निबंधक विशाल लोंढे, प्रकल्प अधिकारी सचिन फुलझेले यांच्या मार्गदर्शनाखाली पोंभुर्णा तालुक्यातील समतादूत मोरेश्वर वाकडे यांच्या मार्फत 26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर संविधान जागर सप्ताह राबविण्यात आला त्या अनुषंगाने पोंभुर्णा येथील. विहार, शाळा, महाविद्यालय, वसतिगृह. यां ठिकाणी संविधान दौड, प्रश्न मंजुषा, गीत गायन स्पर्धा, भाषण स्पर्धा, प्रबोधन कार्यक्रमा च्या माद्यमातून जागर अभियान राबावन्यात आले.
जनता विद्यालय मध्ये संविधान जागर समारोपीय कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाची सुरवात संविधान उद्देशिकेचे वाचन करून करण्यात आली त्या नंतर संविधानाने भारतीयांना काय दिल भारतातील प्रत्येक नागरिकांस मतदानाचा अधिकार देऊन जनसामान्य व्यक्ती च्या हिता साठी योग्य काम करेल असा राजा बनवण्याचा अधिकार दिला, एवढेच नवे तर महिलांना भारताच्या सर्वोच्च पदावर पोहचण्या अधिकार दिला, आणि कलम 14 ते 21अ
सांगून केवळ शिक्षित होण्यापूरते शिक्षण न घेता उच्च शिक्षण घेऊन स्वताची व समाजाची प्रगती करता यावी,
संविधान वाचनाची आवड निर्माण व्हावी, संविधानातील महत्व पूर्ण तरतुदी त्यांच्या पर्यन्त पोहचविण्याचे कार्य या उपक्रमात करण्यात आले.
उपस्थित विद्यार्थ्यांची प्रश्न मंजुषा स्पर्धा घेण्यात आली. यावेळी जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. बघेल सर, कासवटे सर व सर्व शिक्षक वृंद तसेच इतर सहकारी कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन गेडाम सर यानी तर आभार सोनवणे सर यांनी मानले















