prabodhini news logo
Home कल्याण प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – महापरिनिर्वाण दिन

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – महापरिनिर्वाण दिन

0
102

जीवनात झिजलेत
सदा ते वंचितासाठी
त्याग केला परिवार
भिमा तू दलितांसाठी. १

भीमा तुझ्या जन्मामुळे
भविष्य घडले खरे
संविधान महोत्सव
जगी गौरवाचे ठरे. २

सहा डिंसेबर छप्पनाला
बाबासाहेबांचा बुध्दवास
स्मरणात ठेऊ सर्वांनी
महापरिनिर्वाण दिवस. ३

नरनारि समानता
जातीभेद मिटविला
नवा समृध्द भारत
साहेबांनी घडविला. ४

डाॅ बाबासाहेबांमुळे
मिळे मानवाधिकार
देशातील जनतेला
मतदान अधिकार.. ५

सौ. रेखा .भा. मालपुरे
कल्याण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here