prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – डॉ. बाबासाहेबांना विनम्र...

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – डॉ. बाबासाहेबांना विनम्र अभिवादन

0
133

रत्न जन्मले पोटी भारत मातेच्या
रूपात प्रकटले भीम रावांच्या
झटले उद्गारा दीनदलितांच्या
विचारधारा बाबा साहेबाबांच्या

विचारांती साकारले संविधान
दूरदृष्टी ठेवून केले लेखन
समोर ठेवून लक्ष सामान्य जन
त्याचा स्वीकार केला समाजानं

समाजाला दिले त्यांनी वरदान
शिक्षणाचे सर्वास उघडूनी दालन
अधिकार दिले सर्वास समान
कर्तव्ये दिली सर्वांना समजावून

हृदयात देशवासीयांच्या स्थान
बाबा साहेब तुम्ही मानव महान
काळ रात्रींनी तुम्हा झडप घालून
नेले दूर आमच्यातून हिरावून

प्रतिभा सडेकर
वडगाव बेळगाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here