
प्रिय आम्हा बाबासाहेब आंबेडकर
भारतीय संविधानाचे शिल्पकार
आम्हा दिलेत तुम्ही अनेक अधिकार
जनतेवर केलेत भयंकर उपकार ||१||
स्वातंत्र,समता बंधुभाव दिलीत जाण
दिलात हक्क लेखन,वाचन भाषण
झालो आम्ही स्वपदी तयार चालण्या
या सार्याचे आपणच आहातभूषण ||२||
चवदार तलाव करून मुक्त
तृष्णा भागवून बनला आधार
करुनी नेतृत्व आपण ,दिलासा देऊन
दलितासाठी झगडून केलात उद्धार ||३||
सार्या सज्ञानी जनतेस दिला मतदान हक्क
निवडणूकीस उभे राहून करण्या राजकारण
असो अंध अपंग रंकराव दलित
होऊनी प्रतिनिधी उठवा विकासाचे रान ||४||
शिक्षणाचे दालन करूनी मुक्त
ज्ञानाची गंगा वाहती केली सर्वासाठी
महामानव म्हणूनी राहिलात चित्ती
जन्मा आलात जनाच्या कल्याणासाठी ||५||
विठ्ठल पंडित
गोमेवाडी















