prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर...

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन

0
107

मध्यप्रदेशातील महुगावी
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
भिमाबाई रामजी बाबांच्या पोटी
जन्म घेतला विश्वरत्नानी

चौदा एप्रिल अठराशे एक्याणव
चौदावे अपत्य जन्मले
भर दुपारी बारा वाजता
भीमराव नाव तयाचे ठेविले

सातारा येथील कॅम्प स्कुल
भीमरावांचे प्राथमिक शिक्षण
दापोलीत ही काही काळ
मातोश्रींचे झाले निधन

सहपरिवार आले मुंबईत
लोअर परळमधील डबक चाळीत
अध्ययन झाले सुरू
दहा बाय वीस च्या खोलीत

अवघे चौदा – पंधरा चे वय
रमाबाई सह विवाह ठरला
नऊ वर्षीय अजाण पोर
संसाराचा गाडा सुरू झाला

रोज अठरा तास अभ्यास करून
बडोदा नरेशांची शिष्यवृत्ती घेऊन
अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र पदवी
घेतली मुंबई विद्यापीठातून

अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात
एकोणीसशे पंधरा मध्ये प्रवेशून
प्राचीन भारतीय व्यापार विषयावर
घेतली पीएचडी संशोधन करून

अशिक्षित व गरीब लोकांना
दिला संदेश जागरूक करून
सुरू केले मूकनायक साप्ताहिक
बहिष्कृत भारत मासिक छापून

माझा सलाम महानायकाला
ज्याने दिले संविधान देशाला
लोकशाहीचा अर्थ कळला
शिकुनी संघटीत होवू चला

सौ.वंदना पाटील
मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here