
पिता रामजी मालोजी
निर्माता ही भिमाआई
गत जन्माची पुण्याई
पोटी आलेत भीमाजी
ज्ञानाची आवड भारी
शिक्षणाला विलायती
रूढीवादीचे विरोधी
युगदृष्टा क्रांतिकारी
ध्येयतप शिरोमणी
भारतरत्नाचे मानी
संविधानाचे निर्माते
बोद्ध धर्म अनुयायी
लोकशाही गणराज्य
नागरिक अधिकार
दिली समता बंधुता
भारताचे संविधान
देशी परदेशी गेले
मोह माया ना भाळले
स्त्रीचे उद्धारक बाबा
स्त्रीला कधी ना भाळले
मदिरा पासून दूरी
व्यसनाधीन ना होता
साक्षरता नारा दिला
दूत हा विश्वशांतीचा
संविधान मोठी शक्ती
मतदान अधिकार
देई आम्हा अभिव्यक्ती
नर नारी समानता
विजया रमेश सोनी
सुरत गुजरात















