prabodhini news logo
Home चंद्रपूर मौजा बल्लारपुर (माल) येथे खास मंडईनिमित्त “जिवलगा घायाळ मी” नाटकाचे आयोजन

मौजा बल्लारपुर (माल) येथे खास मंडईनिमित्त “जिवलगा घायाळ मी” नाटकाचे आयोजन

0
91

माजी जि. प. सदस्य प्रमोद चिमूरकर यांच्या अध्यक्षेत नाटकाचे उद्घाटन संपन्न

रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज – ब्रम्हपुरी तालुक्यातील बल्लारपुर (माल)येथे जय बजरंगबली युवा नाट्य कला मंडळ,यांच्या वतीने खास मंडईनिमित्त कलादर्पण रंगभूमी वडसा प्रस्तुत “जिवलगा घायाळ मी” या तीन अंकी नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. या नाटकाचे दिपप्रज्वलन विनोद झोडगे बोडदा,विजयजी आदे वनरक्षक बल्लारपूर, उर्मिला दिवटे सरपंच बल्लारपूर,अमोलजी मोरांडे पो.पा.बल्लारपुर,या कार्यक्रमाचे उद्घाटक. उपसरपंच वांद्रा गुरुदेवजी वाघरे यांच्या हस्ते पार पडले.
या नाटकाच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमूरकर उपस्थित होते. कार्यक्रमाला सहउद्घाटक म्हणून.हरीदास चुदरी धान्य व्यापारी मुडझा, ज्ञानेश्वरजी दिवटे ता.अध्यक्ष भा.प.ब्रम्हपुरी, अविनाश मस्के इंजि.भुज,अमोलजी सुकारे इंजि.ब्रम्हपुरी,उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उपाध्यक्ष.तनमयजी देशकर ब्रम्हपुरी,निलकंठजी मानापुरे मा.पं.स.ब्रम्हपुरी,रोषणजी नवघडे वांद्रा, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे. प्रफुल ठिकरे भुज, ज्ञानेश्वरजी झरकर संचालक कृ.उ.बा.स. ब्रम्हपुरी, दिपक ठाकरे उपसरपंच बोडधा,सचिनजी बदन बोडधा,रुपेशजी बानबले आवळगाव, होमाजी नैताम सरपंच मुडझा,अनिलजी दिवटे तं.मु.स.अ.,यशवंत राऊत हळदा,लोनारे आफिसर,शेखर चंद्रग्रीलवार, शुभम कोमटी,हुलके,धनराज पाटिल,रमेश उरकुडे, अरविंद मोरांडे,यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
या नाटकाच्याच्या उद्घाटनप्रसंगी प्रमोद चिमूरकर म्हणाले की, मंडई ही आपल्या प्राचीन संस्कृतीची ओळख आहे. मंडई हे ग्रामीण भागातील लोककलेचे प्रतिक आहे. ग्रामीण भागामध्ये मंडईचे मोठ्या आवडीने आयोजन केले जाते. मंडईच्या माध्यमातुन लोककला जोपासली जात आहे. अशा कार्यक्रमांचे आयोजन केल्याने मनोरंजनासोबतच परस्पर सौहार्दही वाढतो. संस्कृती, परंपरा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहात. हे खरच अभिमानास्पद बाब आहे.
खास मंडईनिमित्त जय बजरंगबली युवा नाट्य कला मंडळ, बल्लारपूर (माल) यांच्या वतीने आयोजित राजसा रंगभूमी वडसा प्रस्तुत “जिवलगा घायाळ मी” नाटकाचा बल्लारपूर (माल)येथील जनतेने आनंद घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here