prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – सावित्रीबाई फुले

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – सावित्रीबाई फुले

0
95

सावित्री आईच्या कष्टाने
फुलला शिक्षणाचा मळा
मुलींच्या शिक्षणासाठी
सोसल्या अनंत कळा…१

जिद्दीने विषमतेवर
केला ज्ञानाने प्रहार
स्त्रीच्या सन्मानासाठी
पेलला अपमानाचा भार…२

जीवन झाले सार्थक
दिले मुलींना जीवनदान
आदर्श शिक्षणाचे कार्य
सावित्रीमाईमुळे महान…३

घडला इतिहास नवा
ज्ञानज्योतीच्या त्यागाने
मिळालं स्ञीला जीवनदान
त्यांच्या अविरत कष्टाने…४

प्रेरणादायी माईंचे विचार
प्रत्येक मनात बिंबवुया
ज्ञानदानाचा महान वसा
अखंड आम्ही टिकवुया…५

डॉ. स्मिता गजभिये
लाखनी, जिल्हा भंडारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here