prabodhini news logo
Home चंद्रपूर गायत्री अनिल कुमार रामटेके यांना आंतरराष्ट्रीय फुले प्रेमी समाज रत्न पुरस्काराने सन्मानित

गायत्री अनिल कुमार रामटेके यांना आंतरराष्ट्रीय फुले प्रेमी समाज रत्न पुरस्काराने सन्मानित

0
132

नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – पुणे येथे झालेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल 2026 मध्ये आयुनी. गायत्री अनिल कुमार रामटेके यांची सामाजिक कार्यात खूप मोलाचे योगदान आहे.मी जिजाऊ बोलते,मी सावित्री बोलते,मी रमाई बोलते हे एक पात्री प्रयोग महाराष्ट्र आणि तेलांगणा येथे करून या महामानवांचे कार्य घराघरापर्यंत पोहोचविण्याचे कार्य विनामूल्य करतात आतापर्यंत त्यांचे 170 प्रयोग झाले.त्यांच्या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना आंतरराष्ट्रीय फुले प्रेमी समाज रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
दिनांक 2 ते 5 जानेवारी 2026 या कालावधीत पुण्यातील एस एम जोशी फाउंडेशन सभागृहात सलग चार दिवस आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल पार पडला. चार तारखेला मी सावित्री बोलते हे हे एकपात्री प्रयोग सादर केले असता सर्व सभागृह मंत्रमुग्ध झाले या कार्यक्रमाचा उद्देश सावित्री फुले विचारांचा जागर करणारा ठरला.या कार्यक्रमाला महाराष्ट्रासह राज्याबाहेरील कवी गायक संगीतकार गझलकार पोवाडे यांचा समावेश होता. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले अज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या उत्तुंग कर्तुत्वाचा प्रचार प्रसार तसेच देशातील पहिली मुलींची शाळा भिडे वाड्याचा इतिहास तसेच भारतीय संविधानाविषयी समजल्या समाजातल्या तळागाळातल्या शेवटच्या घटकापर्यंत जनजागृती व्हावी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा जागतिक स्तरावर जागर केला गेला.कार्यक्रमाच्या अध्यक्ष आयुनी.गायत्री अनीलकुमार रामटेके होत्या.
या कार्यक्रमाचे आयोजक आद.विजय वडवेराव होते.त्यांनी दोन ते पाच तारखेपर्यंतचा संपूर्ण फुले प्रेमी फेस्टिवल अतिशय उत्तम रीतीने पार पाडला. कार्यक्रमाला 2700 फुले प्रेमींची उपस्थिती होते.चारही दिवस सकाळचा नाश्ता ते दुपारचे जेवण उत्तम दर्जाचे होते फेस्टिवलला आलेल्या प्रत्येक फुले प्रेमी ला भारतीय संविधान ,सन्मानचिन्ह प्रमाणपत्र ,साडी ,देऊन गौरविण्यात आले. आद.रघुनाथ ढोक सत्यशोधक समाज आणी आद.सदाशीव महाजन मानवाधिकार राष्ट्रिय अध्यक्ष उपस्थित होते.
आयुनी.गायत्री ताई रामटेके यांना आंतरराष्ट्रीय फुले प्रेमी समाज रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये आणि मित्र-मैत्रिणींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here