
सण संक्रांतीचा आला
करु सुगडं पुजन
हळदी कुंकवाचा देऊ
सुवासिनींना गं मान
वाण देण्यासाठी आणु
सौभाग्याचे अलंकार
साऱ्या सुवासिनी स्रीया
नटणार थटणार
आपली संस्कृती जपु
देऊ तिळगुळ लाडु
पुरणपोळी करुन
गोरगरीबांना वाढु
सुर्याचे उत्तरायण
होते मकरसंक्रांत
बहरत येतो दारी
ऋतुंचा राजा वसंत
सौ सुनंदा बाळासाहेब वाळुंज, ठाणे














