
पुणे प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा २०२६ नुकताच विणकर सभागृह, धनकवडी, पुणे येथे उत्साहात पार पडला. शैक्षणिक क्षेत्रासह कला, क्रीडा व समाजसेवेतील विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
स्केटिंग, चित्रकला, गायन, वादन, ट्रेकिंग, हस्तकला, अभिनय, केंद्रीय जागरूकता, क्रीडा प्राविण्य, पठण, शैक्षणिक गुणवत्ता, समाजसेवा, कथक नृत्य अशा विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. मुलांच्या यशाबद्दल पालकांच्या चेहऱ्यावर आनंद व अभिमान स्पष्टपणे दिसून येत होता. विद्यार्थ्यांचे सुप्त गुण ओळखून त्यांना व्यासपीठ देण्याचे मोलाचे कार्य युवा क्रांती संघटनेने केले असल्याचे उपस्थितांनी कौतुक केले.
या कार्यक्रमात युवा क्रांतीतील विविध सदस्य व पदाधिकाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यामध्ये प्रख्यात संशोधक मा. डॉ. अशोक गोविंद नगरकर, ज्येष्ठ समाजसेविका व राष्ट्रीय महिला सल्लागार मा. वसुधा वैभव नाईक, समाजभूषण मा. मयूर शशिकांत भागवत, दिव्यांगांसाठी कार्य करणारे मा. अंकुश बाळकृष्ण आगरकर, प्रभावी वक्ते मा. शिवाजी पोपटराव शेलार, राष्ट्रीय सह संघटक मा. सुरेशआप्पा पुनमचंद गायकवाड, राष्ट्रीय युवती उपाध्यक्ष मा. वर्षा नाईक, पश्चिम महाराष्ट्र महिला उपाध्यक्ष मा. हर्षला मुलाणी, पुणे शहर अध्यक्ष मा. अनिल रेळेकर, पुणे जिल्हा अध्यक्ष मा. राजू नामदेव चौधरी, पुरंदर तालुका अध्यक्ष मा. अमित पोमण, पुणे जिल्हा युवा अध्यक्ष अमित तांबे, राष्ट्रीय महिला कार्याध्यक्ष मा. अमृता पठारे, आदर्श युवा कीर्तनकार ह. भ. प. अंजली ढवळे, राज्य उपाध्यक्ष किसान विकास मंच दीपाली संदीप आंबरे, राष्ट्रीय महिला मार्गदर्शक मा. वैशाली बांगर, राष्ट्रीय संघटक डॉ. राजेश्वर वामनराव हेंद्रे, पश्चिम महाराष्ट्र युवा अध्यक्ष मा. अमर पठारे, शिरूर वनपरीक्षेत्र अधिकारी मा. निलकंठ गव्हाणे, राष्ट्रीय सह कार्याध्यक्ष मा. किरण वाघमारे, ज्येष्ठ कीर्तनकार ह. भ. प. तिरपणकर, अहिल्यानगर जिल्हा महिला अध्यक्ष मा. पल्लवी निलेश पाटील यांचा समावेश होता.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून युवा क्रांती फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष मा. रविंद्र सूर्यवंशी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रमुख पाहुणे म्हणून DRDO चे ज्येष्ठ वैज्ञानिक, माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांच्यासोबत बारा वर्षे कार्य केलेले मा. डॉ. अशोक गोविंद नगरकर यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना मौलिक मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला राष्ट्रीय उपाध्यक्ष ह. भ. प. नाना महाराज कापडणीस, ह. भ. प. मधुकर महाराज अहिरे,मा. नानासाहेब बढे, मा. सुभाष अण्णा शेटे, मा. संगीता रोकडे, मा. प्रतिभा महालकर, मा. गिरीश लोखंडे, मा. राणे महाराज, मा. बाबुराव पवार, मा. राजेंद्र पन्हाळे, मा. शहाजी देवकर, मा. रामदास तांबे, मा. सय्यद भाई यांच्यासह पुणे टीम मोठ्या संख्येने उपस्थित होती.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन वसुधा वैभव नाईक, हर्षला मुलाणी व राजेश्वर हेंद्रे यांनी केले. स्टेज सजावट व दीपप्रज्वलनाची तयारी सायली, मयुरी गौरव पुंडे आणि शरण्य हेंद्रे यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडली. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन पुणे टीमने अतिशय शिस्तबद्ध व यशस्वीरीत्या केले.
युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र, ग्राहक व पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना कार्यरत असून, सर्व पुणे टीमचे मनःपूर्वक अभिनंदन व कौतुक करण्यात आले.















