prabodhini news logo
Home छत्रपती संभाजीनगर नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; माजी महापौर अभिषेक कळमकरवर गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; माजी महापौर अभिषेक कळमकरवर गुन्हा दाखल

0
138

अहमदनगर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – शहराचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकरवर एका २५ वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, अभिषेक कळमकरने तिला शाळेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले होते. याच ओळखीचा फायदा घेऊन कळमकरने तरुणीवर अत्याचार केला.

या सततच्या कंटाळून अखेर संबंधित तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली. अत्याचार करताना आरोपीने व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्याचा आरोपही फिर्यादीने केला आहे. हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करून वारंवार अत्याचार केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

एका माजी महापौरांसारख्या जबाबदार पदावरील व्यक्तीवर अशा प्रकारचे गंभीर आरोप झाल्याने शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे. पोलीस आता या प्रकरणातील तांत्रिक बाबी आणि पुराव्यांची सखोल चौकशी करत आहेत. या घटनेची माहिती समोर येताच नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here