prabodhini news logo
Home जळगांव MPSC Result 2026 : पोलीस उपनिरीक्षक पदावर स्वराज चव्हाण यांची निवड

MPSC Result 2026 : पोलीस उपनिरीक्षक पदावर स्वराज चव्हाण यांची निवड

0
115

जळगाव प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) घेतलेल्या परीक्षेत प्रा. किसन चव्हाण यांचे चिरंजीव स्वराज सुनीता किसन चव्हाण यांची पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदावर निवड झाली आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्वराज चव्हाण सध्या रावेर (जि. जळगाव) नगर परिषद येथे कर निर्धारक प्रशासकीय अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. नोकरी सांभाळत त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली आणि आपल्या जिद्द, मेहनत व चिकाटीच्या जोरावर त्यांनी पोलीस उपनिरीक्षक पद मिळवले.

दरम्यान, प्रा. किसन चव्हाण यांचे दुसरे चिरंजीव सिद्धार्थ चव्हाण हे देखील उच्च पदावर कार्यरत असून ते भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयात पेटंट ऑफिसर म्हणून मुंबई येथे कार्यरत आहेत.

प्रा. किसन चव्हाण हे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आहेत. चव्हाण कुटुंबातील दोन्ही मुलांनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून विविध स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here