
महाराष्ट्राची भूमी संतांची
महाराष्ट्राची भूमी वीरांची
महाराष्ट्राची भूमी बलिदानाची
महाराष्ट्राची भूमी समर्पणाची. ||१||
सह्याद्री सातपुड्याच्या
पर्वत रांगा
राखणदार या महाराष्ट्राचे
हिरवीगार वनश्री शोभते
हे अलौकीक सौंदर्य भूमीचे. ||२||
कृष्णा कोयना कावेरी गोदावरी
नद्यांच्या काठी संस्कृती
जतन
हिरवीगार शेती फळाफुलांच्या बागा
समृद्धीचे परंपरागत वतन. ||३||
विविध धर्म जाती पंथ
इथे नांदती आनंदाने
रिती रिवाज पाळती
मिरविती अभिमानाने. ||४||
याच भूमीत शिवरायांना
घडविले जिजाऊ मातेने
याच भूमीत म.फुले महर्षी कर्वे यांनी
स्त्रीशिक्षण दिले अभिमानाने ||५|
या भूमीत रंगते
भूपाळी ,अभंग वाणी
पोवाडे ,बहारदार लावणी
ज्ञानेशांची ज्ञानेश्वरी
रामदासांचा दासबोध
ज्ञानाची खाणी. ||६||
कृषीप्रधान ही भूमी
व्यवसाय उद्योगधंदे
कारखाने
उपजिवीकेची साधने
साहित्यीक ,राजकारीणी
याच भूमीत जन्मले
कथा कथिती महाराष्ट्राची अभिमानाने. ||७|
असा हा महाराष्ट्र स्वतंत्र
राज्य झाला म्हणून हा
हा दिन महाराष्ट्र दिन होतो
साजरा.
गर्जा महाराष्ट्र माझा
जयजय महाराष्ट्र माझा
ही महाराष्ट्र हिरा देशाचा.
अंजली गरगटे.–पुणे.















