prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – आई

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – आई

0
83

आई माझी लेखणी
शब्दांनी करते वारं
आई तूझ्या शब्दांला
संस्काराची असे धारं।।

प्रत्येक शब्द तुझा तो
पेरून जातो संस्कार
तुझ्यामुळेच खर आई
जीवनाला मिळे आधार।।२।।

आई तूझ्या संस्काराने
हिंमत मला मिळते
तुझ्या मुळेच गं आई
प्रत्येक संकट टळते।।३।।

कुठे सुख कुठे दुःख
केला नाही भेद भाव
प्रत्येक तुझ्या शब्दांनी
सुंदर सजला गाव।।४।।

तुझे एक एक शब्द
मला खूप देतात हिंमत
म्हणून तुझ्या लेकीला
जगात मिळते किंमत।।५।।

आई तुझा निर्भीडपणे
जपत राहीन हृदयात
तुझ्या संस्काराची होऊन
उतरत राहीन मना मनात।।६।।

प्रा. समिंदर निवृत्तीराव शिंदे
लातूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here