
‘माल संपला’च्या नावाखाली नागरिकांची फरफट; सिंदखेडराजात रेशन व्यवस्थेचा बोजवारा
बुलडाणा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – मातृतीर्थ सिंदखेडराजा शहरातील स्वस्त धान्य दुकान क्रमांक १५००२५००२८४ चे दुकानदार संजय सिताराम मेहेत्रे यांच्या विरोधात रेशनधारकांनी गंभीर स्वरूपाची तक्रार दाखल केली असून, मागील तीन ते चार महिन्यांपासून व चालू मे महिन्याचा. रेशनचे धान्य दिले जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून तहसील कार्यालयात लेखी तक्रार सादर करण्यात आली आहे.
तक्रारदार रामेश्वर आत्रासाहेब वानखेडे यांना मागील दोन महिन्याचा चालू मे महिन्यातील रेशन धान्य दिले नाही व विजय सुदाम भालमोडे यांना मे महिन्याचा . आलेले रेशन धान्य दिले नाही तक्रारदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित दुकानदार नागरिकांना वारंवार माल संपला दोन दिवसांनी या अजून बाकी आहे. तुम्हाला आला की फोन करतो. आणि फोन लावतच नाही आम्ही फोन केला तर उचलत नाही. शासनाकडून मालच आला नाही अशी कारणे देत हेलपाटे मारायला लावत आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, धान्य घेण्यासाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत असून दुकानदारांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. काही वेळा फोन केल्यावर मी शेतात आहे दवाखान्यात आहे अशी कारणे सांगून वेळ मारून नेली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. अनेक वेळा सकाळपासून संध्याकाळपर्यंत चक्रमारून व दुकानासमोर थांबूनही दुकानदार हजर राहत नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, दुकानावर माल किती आला आणि किती वाटप झाला याची कोणतीही माहिती बोर्डावर लावण्यात येत नाही. त्यामुळे धान्य नेमके कुठे जाते? असा संतप्त सवाल आता रेशनधारक विचारू लागले आहेत. काही नागरिकांनी दुकानदार राजकीय दबाव टाकत असल्याचाही आरोप केला आहे.
फोन केला तर शेतात आहे दवाखान्यात आहे अशी कारणे सांगितली जातात. पण प्रत्यक्षात धान्य वाटप होत नाही. गरीबांच्या तोंडचा घास हिरावला जात आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया तक्रारदारांनी व्यक्त केली.
दरम्यान, संबंधित दुकानदारावर तातडीने कठोर कारवाई करून थकीत धान्य वाटप करण्यात यावे, अन्यथा तहसील कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने उपोषण आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा तक्रारदारांनी प्रशासनाला दिला आहे.
या गंभीर आरोपांमुळे सिंदखेडराजा शहरातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासन आता काय भूमिका घेते याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. अर्जाची प्रत महसूल मंत्री ना. बावकुळे, जिल्हाधिकारी बुलढाणा, जिल्हा पुरवठा अधिकारी व उपविभागीय अधिकारी सिंदखेडराजा यांना देण्यात आली आहे.















