Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे रविवार विशेष कविता – खरं प्रेम

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे रविवार विशेष कविता – खरं प्रेम

0
35

वीण दोघातली
तुटणारच नाही
मनातले प्रेम कधी
मिटणारच नाही।।१।।

खरं प्रेम नेहमीच
सदैवव साथ देते
सुख अन दुःखात
नात्याला जपत जाते।।२।।

खरं प्रेम म्हणजेच
अथांग सागर आहे
सगळीकडे प्रेमाचा
खरोखर वावर आहे।।३।।

खऱ्या प्रेमात दिसते
आपुलकी नि जिव्हाळा
म्हणून खरोखर प्रेमाचा
सदैव फुलत राहतो मळा।।४।।

प्रेमाच माणसाला सदा
अगदी घट्ट बांधून ठेवते
म्हणून प्रेमाने दोन शब्द
खोल हृदयात जागा करते।।५।।

प्रेमामध्ये असते बघा
महान अशी एक शक्ती
प्रेमामुळेच मिळते हो
आपल्या जीवनाला मुक्ती।।६।।

म्हणून द्यायचे असेल तर
फक्त प्रेमाचं वाटत जावे
एक दुसऱ्याच्या मनामध्ये
एक आनंद निर्माण करावे।।७।।

प्रा. समिंदर निवृत्तीराव शिंदे
लातूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here